कटक : विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात खेळणार असल्याची माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी दिली. उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट खेळू शकला नव्हता. (Virat)
रविवारी कटकमधील बाराबाती स्टेडियमवर भारत-इंग्लंड सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी झालेल्या सरावसत्रास विराट उपस्थित होता. त्याने काही काळ नेट्समध्ये फलंदाजीही केली. त्याला कोणताही त्रास जाणवत नसून तो सामन्यात खेळण्याकरीता तंदुरुस्त असल्याचे कोटक यांनी सांगितले. या मालिकेनंतर एका आठवड्याच्या अंतराने चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी महत्त्वाची स्पर्धा असल्याने विराटच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. तथापि, विराट फिट झाल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Virat)
विराट संघात परतणार असल्यामुळे पहिल्या सामन्यात खेळलेल्या कोणत्या खेळाडूस संघाबाहेर ठेवले जाईल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कोटक यांनीही याविषयी भाष्य करण्याचे टाळले. हा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा निर्णय असेल, असे कोटक म्हणाले. पहिल्या सामन्यात विराट खेळणार नसल्याचे स्पष्ट होईपर्यंत श्रेयसला संघाबाहेर ठेवण्याचे निश्चित झाले होते. तथापि, अचानक मिळालेल्या संधीचे सोने करत श्रेयसने पहिल्या वन-डेत ३६ चेंडूंमध्ये ५९ धावांची वेगवान खेळी केली. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता नगण्य आहे. परिणामी, शुभमन गिलला सलामीस खेळवून यशस्वी जैस्वालला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. विराटच्या अनुपस्थितीत शुभमनने पहिल्या वन-डेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येत ८७ धावा फटकावल्या होत्या. (Virat)
हेही वाचा :
मुलाणी, कोटियनने मुंबईला सावरले