Home » Blog » Vinesh phogat : विनेश उभारणार क्रीडा अकादमी

Vinesh phogat : विनेश उभारणार क्रीडा अकादमी

सरकारडून मिळालेले ४ कोटी वापरणार

by प्रतिनिधी
0 comments
Vinesh phogat

चंडीगड : भारताची माजी कुस्तीपटू आणि हरियाणाची आमदार विनेश फोगटने युवा खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारण्याची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरी गाठल्याबद्दल हरियाणा सरकारतर्फे विनेशला चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून हे पैसे ती अकादमीसाठी वापरणार आहे. (Vinesh phogat)

हरियाणा सरकारच्या धोरणानुसार ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूला सरकारी नोकरी, भूखंड किंवा रोख रक्कम यांपैकी एक पर्याय बक्षीस म्हणून निवडता येतो. यांमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस सहा कोटी, रौप्यपदकासाठी चार कोटी, तर ब्राँझपदकासाठी २.५ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची तरतूद आहे. विनेशने ऑलिंपिकमध्ये महिला कुस्तीत ५० किलो गटातून अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे तिचे किमान रौप्यपदक निश्चित झाले होते. तथापि, अंतिम फेरीपूर्वी चाचणीवेळी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे, तिचे ऑलिंपिक पदक हुकले असले, तरी हरियाणा सरकारतर्फे तिला रौप्यपदकासाठी असलेले बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तिने चार कोटी रुपयांची निवड केली. (Vinesh phogat)

विनेशने शनिवारी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून क्रीडा अकादमीविषयी माहिती दिली. उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या क्रीडासुविधा आणि वातावरण पुरवायचे माझे नेहमीच स्वप्न होते. आता हे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. माझा सन्मान करणाऱ्या समाजाची आणि हरियाणा सरकारची मी ऋणी आहे. मला मिळालेली बक्षीस रक्कम ही एक स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. हे पैसे उदयोन्मुख खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी तयार करण्यासाठी वापरण्यात येतील. योग्य संसाधने उपलब्ध झाल्यामुळे येथील खेळाडूंची गुणवत्ता नव्या उंचीवर पोहोचेल. त्याचबरोबर, कष्टाळू खेळाडू ज्या आदरास पात्र आहे, तो आदरही त्याला या अकादमीत मिळेल. हे केवळ माझेच नाही, तर आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. विनेश मागील वर्षी हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे जुलाना मतदारसंघातून विजयी होऊन आमदार बनली आहे. (Vinesh phogat)

हेही वाचा :
लखनौ ‘टॉप फोर’मध्ये
ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00