Home » Blog » Vijay Shah :  कर्नल कुरेशी यांच्याबद्दलचे वक्तव्य शाह यांना भोवले

Vijay Shah :  कर्नल कुरेशी यांच्याबद्दलचे वक्तव्य शाह यांना भोवले

मंत्री शाह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Vijay Shah

भोपाळ : प्रतिनिधी :  ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्यावर चारीबाजूनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर त्यांनी माफीनामा सादर केला. मंत्री शाह यांच्या वक्तव्याबद्दल मध्यप्रदेश काँग्रेसने रान उठवले असतानाच ते आता अडचणीत सापडले आहेत. मंत्री शाह यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावा असा आदेश मध्यप्रदेश हायकोर्टाने राज्याच्या डीजीपींना दिले आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठानं विजय शाह यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटले आहे.  या प्रकरणी गुरूवारी सुनावणी होणार आहे.

भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल”, असं विजय शाह म्हणाले होते.

भाजप मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचं शिष्टमंडळाने  श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये मंत्री विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. मध्य प्रदेश काँग्रेस उद्या या प्रकरणी राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, भाजपच्या विजय शाह यांनी सैन्याचा अपमान केला आहे. त्यांना एक मिनिट देखील मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार नाही. विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं देशातील लोकांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाह यांनी माफी मागितली आहे. मी दहावेळा माफी मागण्यास तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असं विजय शाह म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाले, असंही विजय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00