Home » Blog » Vedike agitation: शिवसेना, समिती कार्यकर्ते दहशतवाद्यांसारखे

Vedike agitation: शिवसेना, समिती कार्यकर्ते दहशतवाद्यांसारखे

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने ओकली गरळ

by प्रतिनिधी
0 comments
Vedike agitation

बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यात काही फरक नाही. शिवसेना, समितीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी दहशतवादी एकसारखेच आहेत, अशी गरळ कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) येथे ओकली. (Vedike agitation)

कंडक्टरवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी छेडलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगावच्या वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात हे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना नारायण गौडा याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांची तुलना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केली. (Vedike agitation)

कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. लाल पिवळे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून वाहनात घातले. आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

बस कंडक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झालेला नारायण गौडा याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना विरोधात गरळ ओकताना समिती आणि शिवसेनेची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना केल्यामुळे मराठी भाषिकात  संतापाची लाट उसळली आहे. (Vedike agitation)

शहरात दाखल होताच नारायण गौडा याने प्रसिद्धी माध्यमांसमोर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेसह स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. नेहमीप्रमाणे समिती विरुद्ध गरळ ओकताना त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना केली. (Vedike agitation)

समिती आणि शिवसेना यांच्यात काही फरक नाही. शिवसेना, समितीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी दहशतवादी एकसारखेच आहेत. बेळगावमधील मराठी गुंडांचे गैरवर्तन माझ्या निदर्शनास आले आहे. कर्नाटकच्या बसेसना काळे फासायचे, बसवाहकाच्या तोंडून ‘जय महाराष्ट्र’ वदवून घ्यायचे वगैरे सर्व गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. बेळगावमधून महाराष्ट्र एकीकरण समिती संपली असल्याच्या पोटदुखीतून समिती असे कृत्य करत आहे, अशी टीका गौडा याने केली.

हेही वाचा :

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी

आरजेडी आमदाराचे निलंबन रद्द

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00