Home » Blog » VC patil death : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन

VC patil death : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन

कवठेएकंद येथे अंत्यसंस्कार

by प्रतिनिधी
0 comments
VC patil death

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, दोन बहिणी आहेत. बुधवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी कवठेएकंद (ता. तासगाव) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.(VC patil death)

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून काम करत असताना त्यांना विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला ‘ए’  ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी कारकीर्द प्रगती योजना, १२/२४ आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंपा भरती, सेवानिवृत्त लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन आदी उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले. कार्यतत्परशैली, पारदर्शकता व योग्य निर्णय असा त्यांचा लौकिक होता. (VC patil death)

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार सांभळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक आणि तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभारही सांभाळला होता. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ४ पुस्तके, १९९ संशोधन पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची १४ पुस्तके आणि १ पेटंटही त्यांच्या नावावर आहे.

हेही वाचा :

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

 पानसरे हत्येतील सहा आरोपींना जामीन

नऊ भारतीयांचा सौदी-अरेबियात मृत्यू

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00