Home » Blog » US Immigration : माझ्या मुलाचे राष्ट्रीयत्व कोणते…?

US Immigration : माझ्या मुलाचे राष्ट्रीयत्व कोणते…?

अमेरिकतील स्थलांतरित पालकांसमोरचा कळीचा प्रश्न

by प्रतिनिधी
0 comments
US Immigration

वॉशिंग्टन : स्थलांतरितांच्या मुलांना जन्माधारीत नागरिकत्व न देण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी स्थगिती दिली आहे. परंतु भारतीय स्थलांतरित पालक अद्यापही अधांतरीच आहेत. स्थलांतरितांपैकी एक असलेला अक्षय सांगतो, ‘ऑर्डर लागू झाल्यास, पुढे काय होते हे आम्हाला माहीत नाही, पण आमच्यापुढचा सर्वांत मोठा प्रश्न आहे तो आमच्या मुलाचे राष्ट्रीयत्व कोणते असेल हा…? (US Immigration)

फेडरल कोर्टांनी स्थगिती दिलेली प्रकरणे प्रकरणे निकाली निघेपर्यंत हा आदेश लागू होऊ शकत नाही. पण उच्च न्यायालयात कोणत्याही बाजूने निकाल लागू शकतो. त्यामुळे या पालकांच्या मुलांचे भवितव्य अनिश्चित आहे. अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांच्या संख्येत भारत दोन नंबरचा देश आहे.

नेहा सातपुते-अक्षय पिसे या दाम्पत्यासह हजारो लोकांसमोर हा प्रश्न आ वासून उभा आहे. नेहा आणि अक्षय यांना पहिल्या मुलाच्या आगमनाची उत्सुकता आहे.(US Immigration)

एक दशकाहून अधिक काळ ते अमेरिकेत काम करतात. हे अभियंता असलेले दाम्पत्य एच-१ बी व्हिसाधारक आहे. या जोडप्याला त्यांच्या मुलाचा जन्म २६ फेब्रुवारीला होईल, असे अपेक्षित आहे.

एका मोठ्या टेक फर्ममध्ये ते नोकरी करतात. त्यांनी सॅन ओझेमध्ये मोठ्या कष्टाने करिअर बनवले आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे त्यांचे स्वप्न भंग पावते की काय, अशी चिंता त्यांना लागली आहे. अमेरिकेत असलेल्या अशा हजारो भारतीयांना या चिंतेने घेरले आहे. आतापर्यंत, पालकांच्या इमिग्रेशन स्थितीकडे दुर्लक्ष करून जन्मसिद्ध नागरिकत्व दिले जात होते.(US Immigration)

या आदेशाचा थेट परिणाम होणार आहे, असे सांगून अक्षय सांगतो, ‘ऑर्डर लागू झाल्यास, पुढे काय होते हे आम्हाला माहीत नाही, पण आमच्यापुढचा सर्वांत मोठा प्रश्न आहे तो आमच्या मुलाचे राष्ट्रीयत्व कोणते असेल हा…?

ही चिंताही रास्तच आहे. कारण न्यूयॉर्क स्थित इमिग्रेशन ॲटर्नी सायरस मेहता सांगतात त्यानुसार, अमेरिकन कायद्यात येथे जन्मलेल्या व्यक्तीला नॉन-इमिग्रंट दर्जा देण्याची तरतूद नाही.

प्रसूती लवकर व्हावी, यासाठी या दाम्पत्याने त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. सर्व काही ठीक असल्यास, ते ५० व्या आठवड्यात प्रसूती करू शकतात, परंतु त्यांनी वाट पाहण्याचे ठरवले आहे.

नेहा सांगते, प्रसूती नैसर्गिक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. अक्षयलाही तसेच वाटते. सुरक्षित प्रसूती आणि माझ्या पत्नीचे आरोग्याला माझे प्राधान्य आहे. नागरिकत्व नंतर असे तो सांगतो.(US Immigration)

लवकर प्रसूती होण्यासंबंधी अनेक भारतीय गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात आल्या होत्या. त्याबाबत अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (AAPI) चे अध्यक्ष डॉ. सतीश कथुला म्हणाले, न्यू जर्सीमधील काही उदाहरणे वगळता अशा फारशा घटना घडलेल्या नाहीत.

ते म्हणाले, ‘आमचे डॉक्टर नीतिमत्तेने काम करतात. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असल्याशिवाय ते असे करणार नाहीत.’

 ५० लाखांहून भारतीयांना फटका

एच १ बी व्हिसा धारकांसाठी अमेरिकन नागरिकत्व अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. स्थलांतरीत भारतीय नागरिकांची येथील संख्या लक्षात घेतल्यास ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील ५० लाखांहून अधिक भारतीय नॉन-इमिग्रंट व्हिसा धारण करतात. जन्मसिद्ध नागरिकत्व आदेशाचा भारतीयांना मोठा फटका बसेल, असा इशारा इमिग्रेशन धोरण विश्लेषक स्नेहा पुरी यांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी केल्यास, या भारतीयांच्या मेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही मुलांना नागरिकत्व मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(US Immigration)

 (सौजन्य : बीबीसी)

हेही वाचा :

१४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर
 भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00