Home » Blog » US-China trade agreement : ट्रम्प यांच्याकडून अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा

US-China trade agreement : ट्रम्प यांच्याकडून अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
US-China trade agreement

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-चीन व्यापार कराराची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून चीनवर ५५ टक्के टेरिफ लावले असून चीन अमेरिकेवर १० टक्के टेरिफ लावणार आहे. चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवेल. तसेच चिनी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण सुरू ठेवण्याचा करारात मान्यता दिली आहे. (US-China trade agreement)

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फर्स्ट या घोषणेला अनुसरुन जगातील अनेक देशावर टेरिफ लादले. अमेरिकेने चिनी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात कराची घोषणा केल्यानंतर अमेरिकेला प्रत्युत्तर देताना चीनने अमेरिकेवर मोठ्या प्रमाणांवर कर लादले. अमेरिका चीन व्यापार युद्धाचे पडसाद जागतिक बाजारावर पडल्याने जगभर आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात होती. दरम्यान बुधवारी ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील व्यापार करार पूर्ण झाला आहे अशी घोषणा केली. अमेरिका चीनवर ५५ टक्के टेरिफ तर चीन अमेरिकेवर १० टक्के टेरिफ लागू करेल. या करारात अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठात चिनी विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात शैक्षणिक संस्थामध्ये चिनी विद्यार्थ्यांची उपस्थिती मर्यादित ठेवली होती. (US-China trade agreement)

ट्रम्प यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की “चीनसोबत आमचा करार पूर्ण झाला आहे. चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवली जातील. तसेच आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठामध्ये चिनी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. आम्हाला ५५ टक्के कर मिळणार आहे तर चीनला दहा टक्के मिळणार आहे”. (US-China trade agreement)

मंगळवारी लंडनमध्ये झालेल्या चर्चेनंतर अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी त्यांचा व्यापार कराराचे नुतनीकरण करण्यासाठी एकमत झाले. दुर्मिळ खनिजावरील चीनने टाकलेले निर्बंध काढून टाकले आहेत. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी लंडनमध्ये दोन दिवसाच्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की “हा फ्रेमवर्क करार गेल्या महिन्यात जिनिव्हा येथे झालेल्या प्राथमिक कराला बळकटी देईल. चर्चेमध्ये तिप्पट अंकापर्यंत गेलेले कर शुल्क कमी करणे हा मुख्य उद्देश होता. (US-China trade agreement)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00