कोल्हापूर : प्रतिनिधी : मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराणाची छोटी प्रत आणि राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत केलेल्या कुराणाची प्रत पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. निमित्त आहे उर्दू कार्निव्हलचे. दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. (Urdu Carnival)
गणी आजरेकर, समीर मुजावर, कादर मलबारी, अबू ताकिलदार, रफिक शेख, रफिक मुल्ला, सामी मुल्ला, रहीम महात, राज महात यांच्या संकल्पनेतून कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उर्दू कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग संचलित नेहरू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली, कोमनपा डॉ. झाकिर हुसेन उर्दू मराठी शाळा, सुसरबाग, शाबाजखान अमीनखान जमादार उर्दू मराठी शाळा जवाहरनगर, गफूर वंटमुरे उर्दू मराठी शाळा विक्रमनगर, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल जवाहरनगर या शाळा कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.(Urdu Carnival)
कार्निव्हलमध्ये उर्दू मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास, उर्दू मुशायरा या उर्दू वाङ्मयातील विविध प्रकारचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच स्नेहसंमेलनाअंतर्गत देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण होणार आहे. कार्निव्हलमध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यामध्ये छोट्या कुराणाची प्रत, राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत केलेल्या कुराणाची प्रत, नाणी मांडण्यात येणार आहेत. तसेच फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्दू भाषेतील जाणकारांनी आणि अभ्यासकांनी कार्निव्हलमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक गणी आजरेकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला मुस्लिम बोर्डिंगचे संचालक, मुख्याध्यापक शकील अहमद, यास्मिन पेटकर, रुखसाना पटेल, महमद ताशिलदार, एस. एस. काझी, यू. एच. मुकादम, अब्दुल सिद्दीकी उपस्थित होते.
हेही वाचा :
पत्रकार हत्येतील प्रमुख आरोपीस अटक