Home » Blog » Suresh Dhas : या लोकांचे अपराध भरले; या ‘आका’ला अटक करावी

Suresh Dhas : या लोकांचे अपराध भरले; या ‘आका’ला अटक करावी

आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर कारवाई मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Suresh Dhas

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कळस झाला आहे. शिशुपालाप्रमाणे या लोकांचे ९९ अपराध भरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि या प्रकरणातील ‘आका’ला लवकर अटक करावी. कारण लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आहे त्यामुळे लवकरच कारवाई केली जावी, अशी आमची मागणी आहे’ असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. (Suresh Dhas)

ते म्हणाले, ’मी कुणाला काही घाबरलो नाही. कुठल्या ‘आका’लाही घाबरत नाही. ‘आका’ कोण ते सगळ्यांना माहीत आहेच. मोठ्या ‘आका’चे नाव समोर आले तर मी घेईन. आधी परळीपर्यंतच गोष्टी घडत होत्या. आता त्यांनी कार्यक्षेत्र वाढवलेय. जुलै २०२३ मध्ये जेव्हा येथील नेते सत्तेत आले तेव्हा त्यांनी त्यांचे मंत्रिपद भाड्याने दिले. काम कसे चालले आहे ते पाहिलेच नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत.’

अजित पवारांनी निर्णय घ्यावा

धस यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावर राहू नये ही लोकांची मागणी आहे, असे सांगून धस म्हणाले, याबाबतचा निर्णय अजित पवारांनी घेतला पाहिजे. अजित पवारच पुढचे नेते आहेत असं वाटूनच लोकांनी अजित पवारांना ४१ जागा निवडून दिल्या. मात्र आता अजित पवार या प्रकरणात चुकले तर त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील. आम्ही छोटे लोक आहोत. आम्ही काही अजित पवारांना सांगणार नाही त्यांनीच योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही धस यांनी केली. (Suresh Dhas)

पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही-धस

पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असं मला काही वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की मी या प्रकरणात कुणाला सोडणार नाही. मात्र एक बाब आहे की बीड पोलिसांमधले काही लोक आहेत जे यांची मदत करत आहेत. असंही धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी या मागण्या केल्या. नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झाली आहे. आता ते कारवाई करतील अशी आशा आहे असंही सुरेश धस यांनी म्हटले आहे. (Suresh Dhas)

हेही वाचा : 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00