Home » Blog » Shamsuddin Jabbar: त्याला रक्ताचे शिंपण घालायचे होते…

Shamsuddin Jabbar: त्याला रक्ताचे शिंपण घालायचे होते…

न्यू ऑर्लिन्समधील हल्लेखोराचे इसिस कनेक्शन उघड

by प्रतिनिधी
0 comments
Shamsuddin Jabbar

वॉशिंग्टन : न्यू ऑर्लिन्समध्ये बुधवारी गर्दीत ट्रक घुसवून हल्लेखोर शमशुद्दीन जब्बारला रक्ताचे शिंपण घालायचे होते, असे धक्कादायक खुलासे तपासात उघड होत आहेत. जब्बारने टेक्सासमधून ट्रक चालवत येताना अनेक व्हिडीओ बनवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जब्बारची आपल्या कुटुंबीयांना मारण्याची योजना होती. नंतर त्याने ‘इसिस’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट होत आहे.(Shamsuddin Jabbar)

सीएनएनच्या वृत्तानुसार, जब्बार त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकणार होता. त्याने व्हिडीओमध्ये सुरुवातीला आखलेल्या कटाची माहिती दिली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी फुटेजच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, जब्बारने नंतर आपली योजना बदलली आणि ‘इसिस’मध्ये सामील झाला. ट्रकमध्ये स्फोटक उपकरणे आणि ‘इसिस’चा झेंडा सापडला आहे. बुधवारी जब्बारने जमावावर ट्रक चालवत १५ जणांचा बळी घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या घृणास्पद हल्ल्याचा निषेध केला.

 शमसुद्दीन बहार जब्बार. शांत, शिस्त आणि विश्वासू माणूस. अत्यंत हुशार, परोपकारी आणि कमालीची कणव असलेल्या शमसुद्दीनने हे कृत्य केले, यावर त्याच्या मित्र, शेजारी आणि नातेवाईकांचाही सहजासहजी विश्वासच बसत नाही. तशा भावना त्याचे मित्र आणि त्याला जवळून ओळखणाऱ्यांनी व्यक्त केल्या. (Shamsuddin Jabbar)

जबारच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबीयाला धक्का बसला आहे. अब्दुर जब्बार हा शमसुद्दीनचा लहान भाऊ. अब्दुर म्हणाला, ‘तो असा नव्हताच. त्याने जे केले ते इस्लामविरोधी आहे. तो काहीअंशी कट्टरपंथी झाला होता. पण त्याचे हे कृत्य धर्माला मान्य होऊ शकत नाही. तो ध्येयवादी होता. आयुष्याला शिस्त आणि दिशा देण्यासाठी तो सैन्यात भरती झाला होता, असे त्याने सांगितले. 

‘अलीकडे त्याच्या वागण्यात बदल जाणवत होता. तो तणावग्रस्त दिसे,’ असे निरीक्षण ड्वेन मार्शने नोंदवले. मार्शने शमसुद्दीनच्या आधीच्या पत्नीशी लग्न केले आहे. ‘इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याने वेड्यासारखे केस कापले. त्याच्या अशा वागण्यामुळे आम्ही त्याच्या मुलींना त्याची भेटही घेऊ देत नव्हतो.’ 

अत्यंत हुशार आणि कष्टाळू अशी शमसुद्दीनची ‘डेलॉइट’मध्ये ओळख होती. तो आयटी तज्ज्ञ म्हणून काम करत होता. तेथील एका माजी सहकाऱ्याने प्रतिक्रिया देताना त्याचे वर्णन ‘अत्यंत हुशार, कामाप्रति निष्ठा असणारा आणि कुणालाही त्रास न देणारा,’ असे केले. तो त्याच्या मुलांबद्दल, विशेषतः त्याच्या मुलींबद्दल खूप बोलत असे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. दरम्यान, या कंपनीने जब्बार आणि त्याने केलेल्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. (Shamsuddin Jabbar)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00