महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे दहाही उमेदवार मुस्लिम समुदायातील आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, शिरोळ व सांगली या जागांचा समावेश आहे. (Vanchit Bahujan Aaghadi)
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून आचारसंहिता लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘वंचित’ने उमेदवार जाहिर करण्यात आघाडी घेत सोशल मीडियावर या १० उमेदवारांची यादी प्रसिध्द केली आहे. या सर्व मतदारसंघात मुस्लिम मतदारसंख्या मोठी आहे. गत विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी पक्ष स्वतंत्रपणे लढला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित स्वबळावर लढणार आहे.
उमेदवारांची यादी
- आरिफ मोहम्मद अली पटेल – शिरोळ विधानसभा
- आल्लाउद्दीन हयातचाँद काजी – सांगली विधानसभा
- इम्तियाज जाफर नदाफ – माण मतदारसंघ
- शहेजाद खान सलीम खान -मलकापुर विधानसभा
- खतीब सैय्यद नातीकोद्दीन -बाळापूर विधानसभा
- सय्यद समी सय्यद साहेबजान- परभणी विधानसभा
- मो. जावेद मो. इसाक -औरंगाबाद मध्य विधानसभा
- सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर- गंगापूर विधानसभा
- अयाज गुलजार मोलवी -कल्याण पश्चिम विधानसभा
- अॅड. मोहम्मद अफरोज मुल्ला -हडपसर विधानसभा
यामधील सय्यद समी सय्यद साहेबजान हे परभणीचे काँग्रेसचे माजी उपमहापौर आहेत. हा परभणीतील बडा नेता वंचितच्या तंबूत गेला आहे. यापुर्वी वंचितकडून ११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये एका तृतीयपंथी उमेदवाराचाही समावेश आहे. आतापर्यत या पक्षाकडून २१ उमेदवारांची घोषणा झाली आहे.
हेही वाचा :
- मोर रोज येतो आजीला भेटायला (व्हिडिओ)
- वस्त्रोद्योगातील प्रदूषक रंगद्रव्यांपासून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती
- AIचे गॉडफादर ‘जेफ्री हिंटन’ यांना ‘नोबेल’; पुन्हा दिला ‘हा’ गंभीर इशारा