कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत. त्यांना पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा गोव्यातील पर्यावरणाचे गाढे अभ्यासक रमेश गावस यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात ‘पर्यावरणीय लढे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे, पर्यावरण अभ्यासक शरद आजगेकर, विनायक देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. (An appeal by environmental researcher Gavas)
गावस म्हणाले, पर्यावरणाचे लढे सापेक्ष आहेत. हे लढे उभारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करावे लागतील. लढणार्या लोकांना पाठबळ द्यावे लागेल. कायदा आणि बुद्धीचातुर्यातून लढ्यांची व्यापक आखणी करावी लागेल. पर्यावरण जोपर्यंत आत्मिक जीवनाशी जोडले जाणार नाहीत, तोवर पर्यावरणाचे लढे यशस्वी होणार नाहीत.
सर्वसामान्य लोकांना पर्यावरण हा विषय क्लिष्ट वाटतो. तो सोप्या शब्दांत सांगावा लागेल. त्यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करावे लागतील. परिस्थिती कशीही असली तरी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत लोकांमध्ये निर्माण करावी लागेल. विविध पातळ्यांवर हे लढे लढावे लागतील तरच पर्यावरणाचे प्रश्न व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील, असे गावस म्हणाले. (An appeal by environmental researcher Gavas)
दुसर्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे म्हणाले, देशात अनेक स्मार्ट सिटी होत आहेत. परंतु त्या स्मार्ट करण्याच्या नादात पर्यावरणाचा बळी दिला जात आहे. हिमालयाचा र्हास होत आहे. नद्या आणि समुद्राचे प्रदूषण वाढत आहे. पर्यावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आहे परंतु पर्यावरणाचे प्रश्न माध्यमांतून हद्दपार होत आहेत. जगभर तंत्रज्ञानाच्या विकासाची गती खूप आहे. हे तंत्रज्ञान आणि मानव यांच्यात सेतू तयार करावा लागेल. धोरण निश्चितीच्या पातळीवर पर्यावरणाला अग्रक्रम द्यावा लागेल. यासाठी पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. पर्यायी माध्यमांचा वापर करुन पर्यावरणाच्या प्रश्नांकडे व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनीच घेतला पाहिजे. (An appeal by environmental researcher Gavas)
किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री शिंदे तर आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले. यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. अनमोल कोठाडिया, सुधाकर निर्मळे, डॉ. सुमेधा साळुंखे, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील शिक्षक, पत्रकार आणि विद्यार्थी उपस्थित होते. (An appeal by environmental researcher Gavas)
महाराष्ट्र दिनमान
मेलबर्न : २०२६ मधील पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद एलेना रायबाकिनाने पटकावले. तिथे प्रथम मानांकित आर्यना सबालेकांचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव केला. २०२३ मधील अंतिम सामन्यात पराभवाचा बदला घेताना एलेनाने आर्यनाचा पराभव केला. (Elena Rybakina won the Australian Open title)
तीन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रायबाकिना अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यावेळी तिने पहिला सेट गमावला होता. पण नंतरचे दोन सेट जिंकत आर्यना सबालेंकाने विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात दोघींच्या खेळावर क्रीडाशौकिनांच्या नजरा होत्या. (Elena Rybakina won the Australian Open title)
पहिल्याच सेटमध्ये एलेना रायबाकिनाने आर्यना सबालेकांची सर्व्हिस ब्रेक केली. एलेनाने पहिला सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये आर्यना सबालेंकाने चुका टाळत झुंज दिली. तिथे हा सेट ६-४ असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये सबालेंकाने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यामुळे ती सामना जिंकणार असे वाटत असताना रायबकिनाने शांतचित्ताने खेळ केला. तिने सलम पाच गेम जिंकत बाजू उलटवली. तिच्या दमदार सर्व्हिस गेमने सबालेकांना बचाव करण्यास भाग पाडले. तिसरा सेट ६-४ जिंकत एलेना रायबाकिनाने ऑस्ट्रेलियन कपावर नाव कोरले. (Elena Rybakina won the Australian Open title)
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ
मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा धक्का पचवत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आज शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. यापुढे अजित पवारांच्या कार्याचा वारसा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळण्याचे शिवधनुष्य सुनेत्रा पवारांना पेलवावे लागणार आहे. (Sunetra Pawar took the oath of office as Deputy Chief Minister)
बुधवारी विमान अपघातात बारामतीत अजित पवारांचा विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगाने पावले उचलत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी तयारी सुरू केली. पती निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. तसेच पक्षाचे सर्वाधिकार त्यांना देण्यात आले. (Sunetra Pawar took the oath of office as Deputy Chief Minister)
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने झाला. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गोपनीय शपथ दिली. यावेळी त्यांचे पुत्र जय पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे यांच्यासह पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली. ‘अमर रहे अमर रहे, अजित पवार अमर रहे’, ‘वहिणीसाहेब आप आगे बढो, हम आपके साथ है’, असे म्हणत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. (Sunetra Pawar took the oath of office as Deputy Chief Minister)
निसर्ग वाचविण्याची चळवळ जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये उभी राहील : डॉ. जगन्नाथ पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी : सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून घेतलेली शपथ उद्या जागतिक पातळीवर घेतली जाईल. केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरता हा संकल्प नसून आशिया खंडातील अनेक संस्था यामध्ये सहभागी होतील. येत्या काळात आशिया खंडामध्ये लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाईल, असा विश्वास आशिया पॅसीफिक क्वालिटी नेटवर्कचे अध्यक्ष आणि जागतिक शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केला.
मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट( माई)या संकल्पने अंतर्गत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या एक हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये दहा झाडे लावण्याचा तसेच दहा दुर्मिळ झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वनसंपदा संरक्षण, हरित ऊर्जा, प्लास्टिक व रासायनिक प्रदूषणाला आळा, आणि पर्यावरण पूरक जीवनशैली या पंचसूत्रीचा पुरस्कार हे नव्या पिढीचे पृथ्वीदूत करणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. (Collective pledge for environmental conservation)
डॉ. पाटील म्हणाले, “विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची भावी पिढी असून त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजात संवादक म्हणून काम करणे अत्यावश्यक आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून तो वेळीच रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण विषयक जागृती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविल्यास येत्या काही वर्षांत करोडो झाडांची निर्मिती होऊ शकते. यामुळे तापमानवाढीसह विविध पर्यावरणीय समस्यांवर आळा बसण्यास निश्चितच मदत होईल”. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींची आणि त्यांनी लागवड केलेल्या सर्व झाडांची माहिती ही वेबसाईटवर ठेवण्यात येणार आहे. तसेच पूर्वीपासून असलेल्या वृक्षांचे संवर्धन, संगोपन या सर्व बाबी या संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले. (Collective pledge for environmental conservation)
‘मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या प्रोजेक्टअंतर्गत भारतासह आशिया खंडातील विविध संस्थांना एकत्र जोडून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि एशिया पॅसिफिक कॉलिटी रजिस्टर यांच्या या मोहिमेचे नेतृत्व डॉ. जगन्नाथ पाटील करत आहेत.
शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या पाच वर्षांत शहीद शिक्षण प्रसारक मंडळामार्फत २५ हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे यशस्वीरित्या संगोपन करण्यात आले आहे.
यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ पी.जी.च्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य प्रा. हिमांशू चव्हाण, मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सरिता धनवडे, शहीद पब्लिक स्कूलचे प्राचार्य जयदीप चरापले, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्ही.व्ही. किल्लेदार यांच्यासह उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (Collective pledge for environmental conservation)
मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा, दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. सुनेत्रा पवार राज्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या घडामोडी राऊत यांनी भाजपवर टीका केली. (MP Raut criticizes BJP)
खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी हा अजितदादांचा स्वतंत्र गट आहे, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, हे शरद पवार बोलतात ते योग्य आहे. पण अजित पवारांच्या निधनानंतर छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा केली. जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपणार नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर राजकीय भाष्य करणार नाही. बोलण्यासारखे भरपूर आहे पण आम्ही बोलणार नाही. मात्र भाजप हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका केली. (MP Raut criticizes BJP)
अजित पवार गेल्याचे दुःख घराघरात आहे. आमच्या घरात देखील दुःख आहे. अजित पवार घरा-घरातला चेहरा होता. हे राजकारण कौटुंबिक आहे. त्याचा पक्ष निर्णय घेईल. फारफार तर अमित शाह निर्णय घेतील”, असेही संजय राऊत म्हणाले. (MP Raut criticizes BJP)
१२ फेब्रुवारीला राष्ट्रवादी विलिनीकरणाची घोषणा होणार होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट
पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत १२ फेब्रुवारीला निर्णय जाहीर होणार होता, असा गौप्यस्फोट खासदार शरद पवारांनी केला. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना पवारांनी हे स्पष्टीकरण केले आहे. दरम्यान विलिनीकरणासंदर्भात १७ जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या नेत्यासोबत असलेल्या बैठकीचा व्हिडिओ बाहेर पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, विधानसभा गटनेता आणि उप मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी आज शनिवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा उप मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी काल शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झाल्या. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत सुनेत्रा पवारांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. (Sharad Pawar’s shocking revelation)
दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधनाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. महापालिका निवडणुकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार होता. पण जिल्हा परिषद निवडणूक लागल्या. या निवडणुकीत एकाच चिन्हावर, घड्याळावर दोन्ही राष्ट्रवादीने लढावे अशी अजित पवारांची इच्छा होती. गेल्या दोन दिवसांपासून याविषयीच्या बातम्या आल्या. त्याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी सुद्धा दुजोरा दिला. अशा चर्चा सुरू होती”, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar’s shocking revelation)
याशिवाय, “अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाली होती. अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय १२ तारखेलाच जाहीर होणार होता” असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जन विधीच्यावेळी शरद पवार उपस्थित होते. दोन्ही विधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार सक्रीय झाले आहेत. त्यांनी आज बारामती येथील निरा वागस नदीची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. (Sharad Pawar is active in Baramati)
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार आतून खचल्यासारखे दिसले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना जड जात होते. त्यांना हुंदका आवरणे कठीण जात होते असे दिसून आले. काल अंत्यसंस्कार झाल्यावर सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. आज रक्षाविसर्जनाला शरद पवार उपस्थित होते. दरम्यान दिवसभर अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदाची निवड होण्याची शक्यता आहे. या घडामोडी सुरू असताना शरद पवार बारामतीमध्ये सक्रीय झाले आहेत. (Sharad Pawar is active in Baramati)
मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. त्या राज्यातील पहिल्या उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शनिवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी दोन विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख ठरवण्यासाठी बैठक होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाचा नेता म्हणून त्यांची निवड होणार असून सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. आज दिवसभर वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी विधीमंडळाचा गटनेतेपदासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी मुंबईला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान शुक्रवारी दुपारी या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची उद्या शनिवारी बैठक होणार असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव विधीमंडळात गटनेता म्हणून अंतिम करण्यात आली आहे. याबाबत प्रफुल् पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)
अजित पवार यांच्या निधनाने सर्वांची झोप उडाली आहे. पण शेवटी शो मस्ट गो ऑफ असे म्हणतात. त्यामुळे पक्षाची जबाबदारी कोणाला तरी द्यावीच लागणार आहे. विधीमंडळातील नेत्यांनी बैठक बोलावली आहे. लोकांची अशी मागणी आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षप्रमुखपद देण्यात यावे अशी मागणी आहे. हा निर्णय विधीमंडळाच्या सदस्यांमध्ये होईल. सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उद्याच त्याचा शपथविधी होऊ शकतो, असे सूचक वक्तव्यही भुजबळांनी केले. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)
दरम्यान अजित पवार यांच्याकडील खाती राष्ट्रवादीकडेच देण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. काल शुक्रवारी रात्री प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. आज शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांबाबत वक्तव्य केल्याने उद्या शनिवारी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sunetra Pawar’s swearing-in ceremony on Saturday)
नव्वदच्या दशकात देशानं मंडल आयोगाविरोधातलं तीव्र आंदोलन अनुभवलं होतं. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते आंदोलन आलं होतं. तसंच एक नवं आंदोलन देशभर उभं राहू लागलं होतं. महाराष्ट्रात त्याची फारशी चर्चा नसली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये ते वणव्यासारखं पसरू लागलं होतं. विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) लागू केलेल्या ‘प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स, २०२६’ या नव्या नियमांविरोधात हे आंदोलन होतं. २०१४ नंतर पहिल्यांदाच थेट भारतीय जनता पक्षातूनही सरकारच्या एखाद्या नियमाविरोधात तीव्र आवाज उमटू लागले होते. पक्षाच्या काही पदाधिका-यांनी राजीनामेही दिले होते. त्यामुळे केंद्रसरकार अडचणीत आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने, त्याला स्थगिती दिल्यामुळे सरकारची मोठ्या संकटातून सुटका झाली आहे. सरकारच्या मदतीला सर्वोच्च न्यायालय धावून आले, असेच म्हणावे लागेल.
विविध थरांतून विरोध
उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अलंकार अग्निहोत्री यांनी राजीनाम्यामागे जे कारण सांगितलं, त्यावरून मोठा गहजब उडाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘ब्राह्मणविरोधी मोहीम’ चालवली जात असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. शिवाय यूजीसीचे नवे नियम हे आपल्या राजीनाम्याचं दुसरं महत्त्वाचं कारण असल्याचं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. हे नियम अप्रत्यक्षपणे खुल्या म्हणजे जनरल वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना गुन्हेगार ठरवतात. हे नियम जनरल कॅटेगरीविरोधी असल्याचं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. (The court came to the government’s aid)
भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष श्याम सुंदर त्रिपाठी, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राजू पंडित यांनीही युजीसीच्या नियमांच्या विरोधात पदाचे राजीनामे दिले. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनीही सवर्ण समाजाच्या समर्थनार्थ कविता शेअर करत #UGC_RollBack ची मागणी केली आहे. भाजप नेते डॉ. संजय सिंह यांनीही युजीसीचे नवे नियम समतोल नसल्याचं म्हटलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. समाजमाध्यमांवर याप्रश्नी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधान हे तेली समाजाचे म्हणजे ओबीसी आहेत, म्हणून त्यांनी आपल्या समाजाला संरक्षण देण्यासाठी हे कायदे आणल्याचा आरोप केला जात आहे. लखनौ विद्यापीठ, मेरठ, हापूड, सहारनपूर, अलवर, मधुबनी, बरेली, झारखंडमधील रांची विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने झाली. करणी सेनेने लखनौमध्ये सवर्ण समाजाच्या समर्थनार्थ आंदोलन केले. (The court came to the government’s aid)
ज्या यूजीसीच्या अधिसूचनेच्या विरोधात आवाज उमटत आहे, ती नेमकी काय आहे आणि एवढा तीव्र विरोध का होत आहे?तेरा जानेवारी २०२६ रोजी यूजीसीने ‘विद्यापीठ अनुदान आयोग विनियम २०२६’ जाहीर केले. त्यांनी २०१२ मधील जुन्या भेदभावविरोधी (अँटी-डिस्क्रिमिनेशन) चौकटीची जागा घेतली आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानता वाढवणे. कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांबाबत भेदभाव होऊ नये, असा त्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.
प्रत्येक संस्थेत समता कक्ष
नव्या नियमांनुसार, सरकारी कॉलेज असो किंवा खासगी विद्यापीठ — प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत ‘इक्विटी सेल’ (समता कक्ष) स्थापन करणे बंधनकारक असेल. हा इक्विटी सेल एका प्रकारे लघुन्यायालयासारखे काम करेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याशी भेदभाव झाला असे वाटले, तर तो येथे तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर समितीच्या शिफारशीवर संबंधित संस्थेला तत्काळ कारवाई करावी लागेल. उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव संपवण्यासाठी यूजीसीने नियम अधिक कडक केल्याचे सांगण्यात येते.
धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व या आधारांवर कोणत्याही विद्यार्थ्याशी भेदभाव होऊ नये. विशेषतः अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अपंग व्यक्ती आणि या गटांतील सदस्यांविरुद्ध भेदभाव पूर्णपणे संपवणे, हा या नियमांचा प्रमुख उद्देश आहे.या नियमांनुसार जातीय भेदभाव म्हणजे — फक्त जात किंवा समुदायाच्या आधारावर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गांतील व्यक्तींशी होणारा भेदभाव. (The court came to the government’s aid)
विरोधाचे प्रमुख कारण म्हणजे ओबीसी समाजघटकांनाही (इतर मागास वर्ग) जातीय भेदभावाच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या मसुद्यात फक्त एससी आणि एसटी यांनाच संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र आता ओबीसींचाही त्यात समावेश करण्यात आला असून तेच विरोधाचं मुख्य कारण बनलं आहे. विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, हे नोटिफिकेशन खुल्या वर्गाच्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विरोधात आहे. यामुळे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर खोटे आरोप होऊ शकतात, जे त्यांच्या करिअरसाठी घातक ठरू शकतात.
ओबीसी संरक्षणामुळे आक्षेप
नोटिफिकेशननुसार, प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत इक्विटी कमिटी (समता समिती) तयार केली जाईल. या समितीत ओबीसी, अपंग, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे. ही समिती भेदभावाच्या तक्रारींची चौकशी करेल. या समितीत खुल्या वर्गाला प्रतिनिधित्व नसल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. ओपन कॅटेगरीचा सदस्यच नसेल, तर चौकशी निष्पक्ष कशी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. (The court came to the government’s aid)
उच्च शिक्षण क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांनाही भेदभावाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्यांना संरक्षण देणं आवश्यक असल्याचं याप्रकरणी सरकारचं म्हणणं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण विषयक संसदीय समितीनं त्यासंदर्भातील शिफारस केली होती. त्याच शिफारशीच्या आधारे ओबीसींनाही या नियमांच्या कक्षेत आणण्यात आलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी युजीसीनं ही अधिसूचना मागे घ्यावी आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे. कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव चुकीचा आहे. भारतात अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे दुष्परिणाम आधीच भोगले आहेत. पण कायदा सर्वसमावेशक असायला नको का? कायदा लागू करताना भेदभाव का? खोट्या तक्रारींचे काय करणार?” असे प्रश्नही प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केले आहेत.
हे नियम अस्पष्ट, एकतर्फी आहेत आणि त्यांचा दुरुपयोग होण्याची मोठी शक्यता आहे. इक्विटी कमिटी आणि स्क्वॉडमध्ये सामान्य वर्गाच्या प्रतिनिधित्वाची कोणतीही अट नाही, त्यामुळे या समितींना अतोनात अधिकार मिळू शकतात. ‘भेदभाव’ ही संकल्पना स्पष्टपणे परिभाषित केलेली नसल्यामुळे खोट्या तक्रारी दाखल होण्याचा धोका आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘संभाव्य गुन्हेगार’ मानले जाऊन त्यांच्यासंदर्भातच भेदभाव होऊ शकतो, असे या नियमांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. संस्थांची मान्यता रद्द करणे किंवा निधी थांबवणे अशा शिक्षात्मक तरतुदींमुळे संस्थांची स्वायत्तता धोक्यात येईल, अशीही भीती व्यक्त केली जात होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मात्र हे नियम निष्पक्ष आणि न्याय्य पद्धतीने अंमलात आणले जातील, असं आश्वासन दिलं होतं.या नियमांविरोधातील आंदोलन देशव्यापी बनले. दिल्लीत यूजीसी मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.#UGCRollback, #ShameOnUGC हे हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेकांनी या नियमांना “काळा कायदा” असे संबोधले आहे.
नव्या नियमांद्वारे सरकारला खरोखर ओबीसींसह मागास घटकातील अन्य विद्यार्थ्यांना संरक्षण द्यायचे आहे, की यामागे त्यांचे काही राजकारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु या नव्या नियमांनी देशात पुन्हा एक वणवा पेटला होता. तो भडकत चालला होता. एखाद्या निर्णयावरून माघार घेणे सरकारसाठी नामुष्कीजनक ठरले असते. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय सरकारच्या मदतीला धावले आणि या नव्या नियमांना स्थगिती देण्यात आली. (The court came to the government’s aid)
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात ११ आरोपी होते. त्यामध्ये तीन आरोपी फरार झाले. आठ जणांना अटक केली. गांधी हत्या खटल्यातून स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली. गांधी हत्येप्रकरणी पोलिसांनी कोणता तपास केला, न्यायालयात कोणाला शिक्षा झाली याचा आढावा या लेखात घेऊया.
सतीश घाटगे
गांधी हत्येत एकूण ११ आरोपी, तीन फरार
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधींना १९४४ मध्ये राष्ट्रपिता ही पदवी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम विनायक गोडसे याने बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी त्याच दिवशी दिल्लीतील पोलिस ठाण्यात सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी एफआयआर नोंदवला गेला. तुघलक रोडवरील नंदलाल मेहता यांनी एफआयआर नोंदवला. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी २७ मे १९४८ रोजी कोर्टात आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी १४९ जणांची साक्ष नोंदवली. गांधी हत्येमध्ये एकूण ११ आरोपी होते. त्यापैकी गंगाधर दंडवती, गंगाधर जाधव आणि सुरदेश शर्मा यांना पोलिसांनी फरार घोषीत केले. नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल के पहवा, शंकर किस्तया, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे, विनायक दामोदार सावरकर हे आरोपी होते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, १२० ब, १०९, ११४ आणि ११५ अंतर्गत गुन्हे, स्फोटक पदार्थ कायद्याचे कलम ३, ४, ५ आणि ६, भारतीय शस्त्र कायद्याचे कलम १९. या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गांधी हत्येच्या सुनावणीसाठी मुंबई सार्वजनिक सुरक्षा उपाययोजना कायदा १९४७ च्या कलम १० आणि ११ अंतर्गत ४ मे १९४८ रोजी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
नथुराम गोडसे, नारायण आपटेला फाशीची शिक्षा ठोठावली
दिल्लीतील लाल किल्ला येथे विशेष न्यायालयात २२ जून १९४८ रोजी जस्टीस आत्म चरण यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. ‘द क्राऊन विरुद्ध नथुराम विनायक गोडसे आणि इतर’ असे खटल्याचे शिर्षक होते. सहा नोव्हेंबर १९४८ रोजी साक्षीदार आणि पुराव्याची तपासणी झाली. १० फेब्रुवारी १९४९ रोजी विशेष न्यायालयाने २७ प्रकरणातील ११० पानांचा निकाल वाचून दाखवला. या खटल्यातील नथुराम गोडसे, नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा ठोठावली. मदनलाल के पहवा, शंकर किस्तया, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. (The case is about the assassination of Gandhi)
स्वातंत्रवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली. सावरकरांविरुद्धचा खटला हा केवळ माफी मागणाऱ्याच्या पुराव्यावर अवलंबून आहे असे न्यायालयाने नमूद केले. त्यांच्या विरुद्ध माफी मागणाऱ्याच्या पुराव्यावरुन कोणताही निष्कर्ष काढणे असुरक्षित ठरेल. त्यामुळे २० जानेवारी १९४८ ते ३० जानेवारी १९४८ रोज् दिल्लीत घडलेल्या घटनांमध्ये सावरकरांचा काही होता असे मानण्याचे कोणतेही कारण नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवण्यात आले.
अंबाला तुरुंगात गोडसे, आपटेला फाशी दिले
या शिक्षेविरुद्ध दोषी व्यक्तींनी सिमला येथील पूर्व पंजाब उच्च न्यायालयात अपील केले. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती ए.एन. भंडारी, जी.डी खोसला आणि न्यायमूर्ती अच्छरु राम या तीन न्यायाधीशांसमोर झाली. २१ जून १९४९ रोजी उच्च न्यायालयाने पाच आरोपींची शिक्षा कायम ठेवली. दत्तात्रय परचुरे आणि शंकर किस्तया यांची निर्दोष मुक्तता केली. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. दोघांना अंबाला तुरुंगात १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली. विष्णू करकरे, मदनलाल पहवा, गोपाळ गोडसे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. ऑक्टोबर १९६४ मध्ये तिघांची शिक्षा भोगून झाल्यावर तुरुंगातून सुटका झाली. शंकर किस्तया आणि दत्तात्रय परचुरे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नव्हते त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असे कोर्टाने निकालात सांगितले. (The case is about the assassination of Gandhi)
महात्मा गांधी यांच्या हत्येचा कट रचला होता. आणि या कटात गोडसे आणि आपटे हे दोघे मुख्य आरोपी होते असा उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला. न्यायमूर्ती अच्छरु राम आणि न्यायमूर्ती भंडारी यांनी गोपाळ गोडसे आणि मदनलाल पाहवा यांच्या लहान वयामुळे त्यांची शिक्षा कमी करण्याची शिफारस केली होती. परंतु न्यायमूर्ती खोसला यांनी दोघांची शिक्षा कमी करण्याच्या शिफारशीला असहमती दर्शवली.
न्यायमूर्ती अच्छरु राम यांनी निरीक्षण नोंदवले की, “दोघेही खूपच तरुण आहेत आणि त्यांच्या आयुष्याच्या भरभरटत आहेत. दोघेही अधिक मजबुत आहेत आणि दृढनिश्चयी व्यक्तीच्या प्रभागाखाली आलेले दिसत आहेत.”
न्यायमूर्ती खोसला यांनी त्यांच्या एका परिच्छेदाच्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की,न्यायमूर्ती अच्छरु राम जे यांनी मदनलाल पहवा यांच्या बाजूने केलेल्या दयेच्या शिफारशीपासून मी स्वत:ला वेगळे करु इच्छितो. पहवा यांनी मूळ रचलेल्या कटाच्या योजनेत खूप प्रमुख भूमिका घेतली होती.”
न्यायमूर्ती भंडारी यांनी नमूद केले की विशेष न्यायाधीशांचे दिल्ली पोलिसांविरुद्धचे निरीक्षण अयोग्य होते आणि “कोणताही पोलिस अधिकारी, तो कितीही सक्षम आणि कार्यक्षम असला तरी, नथुरामला गुन्हा करण्यापासून रोखणे अशक्य होते”.(The case is about the assassination of Gandhi)
उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आणि शिक्षा झालेल्या पाचही जणांनी – नथुराम गोडसे, आपटे, करकरे, पहवा आणि गोपाळ गोडसे – खासगी परिषदेकडे अपील करण्याची विशेष परवानगी मागितली होती आणि ती फेटाळण्यात आली.
जवळजवळ ७५ वर्षांनंतर, एप्रिल २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात १९४८ मध्ये झालेल्या महात्मा गांधी हत्या प्रकरणात चुकीच्या खटल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने अभिनव भारत काँग्रेसला २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आणि याचिका फेटाळून लावली की, “भारतीय संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत ही सर्वात चुकीची कल्पना असलेली याचिका आहे. पक्षकार कोणत्याही बाजूने किंवा त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही प्रार्थनेसह सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाहीत.” (The case is about the assassination of Gandhi)