नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने मध्यम-पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. भारतीय लष्करासाठी डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी संयुक्तपणे ही क्षेपणास्रे विकसित केली आहेत. या चाचण्या ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आल्या.(Flight tests)
बहु-कार्यात्मक रडार, कमांड पोस्ट, मोबाइल लाँचर सिस्टम आणि इतर उपकरणांचा यामध्ये समावेश आहे. या आर्मी वेपन सिस्टमने हाय-स्पीड एरियल लक्ष्यांवर चार ऑपरेशनल फ्लाइट चाचण्या घेतल्या.
“या क्षेपणास्त्रांनी थेट मारा करून हवाई लक्ष्यभेद केला. लांब पल्ल्याच्या, कमी पल्ल्याच्या, जास्त आणि कमी उंचीचे चार लक्ष्यभेद या क्षेपणास्रे अचूक भेदली. यामुळे या प्रणालीची कार्यक्षमता सिद्ध झाली,” असे संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.(Flight tests)
या शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनल स्थितीत उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीने तैनात केलेल्या रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमसारख्या रेंज उपकरणांद्वारे कॅप्चर केलेल्या उड्डाण डेटाद्वारे शस्त्र प्रणालीची कार्यक्षमता सत्यापित करण्यात आली.(Flight tests)
“डीआरडीओच्या मार्गदर्शनाखाली पूर्व आणि दक्षिण कमांडकडून भारतीय सैन्याने या चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे दोन्ही लष्करी कमांडची ऑपरेशनल क्षमता सिद्ध झाली आहे आणि दोन रेजिमेंटमध्ये शस्त्र प्रणालीच्या ऑपरेशनलीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि उद्योगांचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “चार यशस्वी चाचण्यांमुळे महत्त्वाच्या रेंजवर लक्ष्य रोखण्याची शस्त्र प्रणालीची क्षमता पुन्हा स्थापित झाली आहे.”
भारतीय लष्कर
इम्फाळ : भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने राबवलेल्या संयुक्त शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. लष्कर, आसाम रायफल्स आणि अन्य सुरक्षा दलांचा या मोहिमेत सहभाग होता. अशांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांमधून ५० शस्त्रे, दारूगोळ्याचा मोठा साठा आणि युद्धसामग्री जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Manipur Weapons)
सुरक्षा दलांनी राबवलेल्या या शोधमोहिमेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने अद्याप अनेकांनी शस्त्रे टाकली नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यपालांनी शस्त्रे टाकण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक गटांनी शस्त्रे सरकारकडे जमा केली होती. मात्र पुन्हा हा सापडला आहे. (Manipur Weapons)
संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि मणिपूर पोलिसांनी ही मोहीम राबवली. गेल्या ४८ तासांत चांडेल, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधील डोंगराळ आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ही आधारित कारवाई सुरू केली. या मोहिमेत ५० शस्त्रे, इम्प्रुवाइज डिव्हाइसिस, ग्रेनेड, दारूगोळा आणि युद्धसामग्री जप्त केली. (Manipur Weapons)
सुरक्षा दलांनी मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील बंकर देखील उद्ध्वस्त केले. कोकी-झो आणि मेइतेई या दोन्ही सशस्त्र गटांनी हे बंकर उभारले होते.
संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे जप्त केलेल्या ५० शस्त्रांपैकी लष्कर आणि आसाम रायफल्सने डोंगराळ चांदेल जिल्ह्यातील लैजांग भागातून २३ इम्प्रुवाइज मोर्टार (पोम्पी), तीन एके सीरिज रायफल, एक इन्सास रायफल, एक कार्बाइन, दोन मझल लोडेड रायफल, एक ०.३०३ रायफल, पाच पिस्तूल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि युद्धसामग्री जप्त केली. (Manipur Weapons)
थौबल जिल्ह्यातही शस्त्रसाठा सापडला. आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी दोन ९ मिमी कार्बाइन, एक १२ बोर रायफल, एक सिंगल बोर बॅरल रायफल (एसबीबीएल) आणि तीन पिस्तूल जप्त केले. आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामेई भागातून एक मोर्टार, एक १२ बोर रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले, असे प्रवक्त्याने सांगितले.
आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई दरम्यान, काकचिंग जिल्ह्यातील वांगू भागातून एक कार्बाइन, एक ०.३०३ रायफल आणि दोन सिंगल बॅरल रायफल जप्त केल्या. (Manipur Weapons) जप्त केलेला हा साठा मणिपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांत मोठ्या संघर्षाचा सामना करणाऱ्या मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सुरक्षा दलांचे हे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत, असे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
आंदोलने दाबून टाकता येणार नाहीत
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पूँछ जिल्ह्यात एलओलसीजवळ भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर, दहा जवान गंभीर जखमी आहेत. (Jammu and Kashmir ) मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ११ मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करी वाहन नीलम मुख्यालयापासून नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा पोस्टकडे जात होते. यावेळी घोरा पोस्टजवळ अपघात झाला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Jammu and Kashmir )
११ मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करी वाहन नीलम मुख्यालयापासून नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा पोस्टकडे जात होते. त्यावेळी घोरा पोस्टजवळ ते वाहन अपघातग्रस्त झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन सुमारे १५० फूट दरीत कोसळले. या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाला तर, चालकासह १० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी ११ मराठा लाईट इन्फंट्रीची क्विक रिॲक्शन टीम (क्यूआरटी) आणि मानकोटे येथील पोलिस दल दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.
Jammu and Kashmir | 5 soldiers lost their lives after an army vehicle met with an accident in the Poonch sector.
Rescue operations are ongoing, and the injured personnel are receiving medical care: White Knight Corps pic.twitter.com/Ky4499XbVF
— ANI (@ANI) December 24, 2024
हेही वाचा :