अमृतसर : पंजाब पोलिसांनी बुधवारी (४ जून) पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील महलान गावातील ‘युट्यूबर’ जसबीर सिंगशी जोडलेले हेरगिरी नेटवर्क उघडकीस आणल्याचा दावा केला. जसबीरला अटक करण्यात आली आहे. (Jasbir Singh)
पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव म्हणाले की, ‘जान महल’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारा जसबीर सिंग हा दहशतवादी समर्थित हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या शाकीर उर्फ जुट रंधावाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे.
डीजीपी म्हणाले की, हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातून हद्दपार झालेला अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश या दोघांशी जसबीरने घनिष्ठ संपर्क ठेवला होता. (Jasbir Singh)
‘‘दानिशच्या निमंत्रणावरून जसबीर दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या कार्यक्रमात तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगरना भेटला होता. २०२०, २०२१, २०२४ मध्ये तो तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तान-आधारित नंबर होते. ते आता तपशीलवार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत,’’ असे यादव म्हणाले. (Jasbir Singh) जसबीर विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि व्यापक हेरगिरी-दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी आणि सर्व सहयोगींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.
हेही वाचा :
मंत्री महाजनांच्या कार्यालयात ३०० फायली पडून
सुपेकरांनी कैद्यांकडून मागितले ३०० कोटी