मुलतान : फिरकीपटूंच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान पाकिस्तानवर १२० धावांनी मात केली. विंडीजने तब्बल ३५ वर्षांनी पाकच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्यात यश मिळवले असून याबरोबरच त्यांनी दोन कसोटींची मालिका १-१ने बरोबरीत सोडवली. (West Indies)
विंडीजने विजयासाठी ठेवलेल्या २५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांचा डाव सोमवारी तिसऱ्या दिवशीच १३३ धावांत आटोपला. बाबर आझम वगळता पाकच्या एकाही खेळाडूस दुसऱ्या डावात वैयक्तिक ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आझमने ६७ चेंडूंमध्ये २ चौकारांसह ३१ धावा केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकॅनने २७ धावांत पाकचा निम्मा संघ गारद केला. केविन सिंक्लेअरने ३, तर गुडाकेश मोतीने २ विकेट घेतल्या. या कसोटीत एकूण ९ आणि मालिकेत १९ विकेट घेणारा वॉरिकॅन सामनावीर व मालिकावीर या दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला. (West Indies)
विंडीजने यापूर्वी, नोव्हेंबर, १९९० मध्ये पाकच्या भूमीवर कसोटीविजय साकारला होता. या विजयामुळे विंडीजने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड चॅम्पियनशीप) गुणतक्त्यातील तळाचे स्थान टाळण्यातही यश मिळवले. या स्पर्धेतील विंडीजचा हा तिसरा विजय ठरला. पाकिस्तानला मात्र या गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील हा पाकचा नववा पराभव ठरला. (West Indies)
संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज – पहिला डाव १६३ आणि दुसरा डाव २४४ विजयी विरुद्ध पाकिस्तान – पहिला डाव १५४ आणि दुसरा डाव ४४ षटकांत सर्वबाद १३३ (बाबर आझम ३१, महंमद रिझवान २५, जोमेल वॉरिकन ५-२७, केविन सिंक्लेअर ३-६१).
Great way to start off your Monday Maroon fans!
![]()
#PAkvWI | #MenInMaroon pic.twitter.com/QnFSv0sqd7
— Windies Cricket (@windiescricket) January 27, 2025
हेही वाचा :
बुमराह आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू
अर्शदीप आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टी-२०पटू