महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (दि.२९) सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार या मुद्द्यांवरून घेरले. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी करत गदारोळ घातला. यामुळे हिवाळी अधिवेशनातील सभागृहाचे कामकाज २ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
आज (दि.२९) लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर इंडिया आघाडीतील खासदारांनी अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार यावर चर्चेची मागणी केली, पण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळली. यामुळे विरोधी खासदार आक्रमक झाले. त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्य सभागृहांचे कामकाज दि. २ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.