बेंगळुरू : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) बोगस मतदार, एकाच पत्त्यावर राहणारे अनेक मतदार आणि अन्यू मार्गाने ‘मत चोरी’ होते. निवडणूक आयोगाच्या संगनमताने ही चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ने वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासणीत मुनी रेड्डी गार्डनमधील एका १० बाय १५ फुटाच्या घरात ८० मतदार नोंदणीकृत असल्याचे आढळले आहे. (Fake Voter Fact)
राहुल गांधींच्या मतदान घोटाळ्याच्या स्फोटक दाव्यांनंतर, ‘इंडिया टुडे’ने बेंगळुरू सेंट्रलमधील मुनी रेड्डी गार्डनमधील १०-१५ चौरस फूट घराला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. त्यावेळी या एकाच पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या येथे राहत असलेल्या भाडेकरूने मात्र या बाबीशी काही संबंध नसल्याचे सांगितले. घरमालकानेही येथे राहणारे आधीचे अनेक भाडेकरू अजूनही मतदान करण्यासाठी येत असतात, असे सांगितले. (Fake Voter Fact)
बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मतदारांमध्ये फेरफार केल्याच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ने वस्तूस्थिती जाणून घेतली. आयटी कॉरिडॉरचा भाग असलेल्या आऊटर रिंग रोडजवळील महादेवपुरा येथील बूथ क्रमांक ४७० वर लक्ष केंद्रित करून ही माहिती जाणून घेण्यात आली.
राहुल गांधी केलेल्या आरोपानुसार मुनी रेड्डी गार्डनमधील घर क्रमांक ३५ मध्ये बातमीदाराने प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. सध्या या घरात फूड डिलिव्हरीचे काम करणारी दीपांकर ही व्यक्ती राहते. तो पश्चिम बंगालमधील आहे. एक महिन्यापूर्वीच तो येथे आला आहे. त्याची बेंगळुरूमध्ये मतदार नोंदणी नाही आणि या पत्त्यावर नोंदलेल्या मतदारांना ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. (Fake Voter Fact)
घरमालकाची कबुली
दीपंकरच्या म्हणण्यानुसार, हे घर भाजपशी संबंधित जयराम रेड्डी यांचे आहे. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रथम त्यांचा भाजपशी संबंध असल्याचे मान्य केले, नंतर त्यांनी ते फक्त भाजपचे मतदार आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते नाहीत असे सांगितले. अनेक भाडेकरू गेल्या काही वर्षांपासून तेथे राहत होते. त्यांनी स्वतः या पत्यावर मतदार म्हणून नोंदणी केली होती, परंतु बहुतेक जण आता येथे नाहीत, पण ते निवडणुकीदरम्यान मतदानासाठी परत येतात, असे त्यांनी कबूल केले.
याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, परंतु आता ती देणार असल्याचे रेड्डी म्हणाले. मतदार यादीत या पत्त्यावर ८० लोक आहेत. अनेक जण ओडिशा, बिहार आणि मंड्यासह इतर राज्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, परंतु त्यापैकी काही अजूनही मतदानादरम्यान मतदानासाठी परत येतात, हे त्यांनी मान्य केले.
बीएलओचाही दुजोरा
बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मुनीरत्ना यांनी इंडिया टुडेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयटी कॉरिडॉरजवळील छोट्या घरात राहणारे अनेक स्थलांतरित कामगार मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी भाडे करारांचा वापर करतात. हे रहिवासी शक्यतो सुरक्षा रक्षक, घरकाम करणारे किंवा घरगुती मदतनीस म्हणून काम शोधणारे असतात. मतदार ओळखपत्र घेतल्यानंतर बरेच जण घर रिकामे करतात, परंतु त्यांची नावे मतदार यादीत राहतात.
हेही वाचा :
राहुल गांधींनी देशाची माफी मागावी : निवडणूक आयोग
घुसखोर ही विरोधकांची मतपेढी : अमित शहांची टीका