मुंबई : प्रतिनिधी : फॉर्मसाठी झुंजणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या आयपीएल मधील खेळीवर भारताचा माजी सलामीवर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे. सेहवागने रोहितला त्याचा वारसा जपण्यास सांगितले असून ‘उसका जाने का समय आ गया’ असेही सूचवले आहे. (Sehwag)
मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा याचा यंदाच्या आयपीएलमधील परफॉर्म्स फ्लॉप झाला आहे. त्याने पाच सामन्यात ०. ७. १३. १७ आणि २८ धावा केल्या आहेत. काल गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेतले. पण पॅट कमिन्सने त्याला २६ धावांवर बाद केले. सहा डावांमध्ये त्याने १३.६६ च्या सरासरीने फक्त ८२ धावा जमवल्या आहेत. (Sehwag)
सेहवागने क्रिकबझशी बोलताना म्हणाला “रोहितच्या १० वर्षातील आयपीएलमधील कामगिरीकडे पाहिले तर त्याने फक्त एकदाच ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे तो अशा प्रकारचा खेळाडू नाही जो ५०० किंवा ७०० धावा करेल. जेव्हा तो भारतीय कर्णधार बनला तेव्हा त्याने म्हटले होते की तो पॉवरप्लेचा फायदा घेऊ घेऊ शकतो. परंतु तो या वस्तुस्थितीचा विचार करत नाही. अब उसका समय आ गया है (त्याच्या निवृत्तीची वेळ आली आहे). आणि निवृत्त होण्यापूर्वी तुम्ही चाहत्यांना तुम्हाला आठवणीत ठेवण्यासाठी काहीतरी देऊ इच्छिता, पण असे क्षण तुम्ही देऊ शकत नाही हे त्याच्या खेळावरुन दिसत आहे. (Sehwag)
सेहवाग म्हणाला “१० चेंडू जास्त घ्या, पण कमीत कमी खेळा आणि स्वतःला एक संधी द्या. तो बऱ्याचदा लेंथ चेंडूंच्या मागच्या बाजूला पुल शॉटवर बाद होत आहे. म्हणून त्याने ठरवावे की एकाद्या डावात तो अजिबात पुल शॉट खेळणार नाही. पण त्याला हे कोण समजावून सांगेल? कोणीतरी त्याला सामान्य क्रिकेट खेळायला सांगायला हवे. मी तिथे असताना सचिन, द्रविड किंवा गांगुली मला सामान्य क्रिकेट खेळायला सांगायचे,” (Sehwag)
हेही वाचा :