नवी दिल्ली : फ्रान्समधील व्हर्साय येथे अमेरिका आणि इराण यांच्यात एक महत्वाचा शांतता करार झाला. आमेरिकेकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तर इराणचे अध्यक्ष मसुद पेझेश्कियान यांनी करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमध्ये हा १४ कलमी करार आहे. लष्करी संघर्ष संपुष्टात आणणे, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे, इराणच्या पुनर्बांधणीसाठी ३०० डॉलर्स देणे असा आराखडा मांडण्यात आला आहे. १९१९ पहिल्या महायुद्ध समाप्तीचा करारही व्हर्साय येथे झाला होता. व्हर्साय तह म्हणून हा करार इतिहासात जगप्रसिद्ध आहे. याच शहरात युद्धबंदी कराराची अंमलबजावणी होण्याचा योगायोग साधला गेला. (Signing of the US-Iran peace agreement)
फ्रान्समध्ये जी सेव्हन शिखर परिषद असून त्याला जी सेव्हनमधील राष्ट्राध्यक्ष उपस्थित आहेत. आज व्हर्साय येथे ट्रम्प यांचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत भोजनाच्या दरम्यान दोन्ही देशांच्या सह्या झाल्या. ट्रम्प आणि मॅक्रॉन शेजारी बसले होते तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियांनी यांनी त्यांच्याकडे करार स्वाधीन केला. करारावर सही करण्यासापूर्वी ट्रम्प यांनी ‘हे सोपे नव्हते’ अशी प्रतिक्रिया दिली. स्वाक्षरी झल्यानंतर ट्रम्प यांनी तो उचलून धरला आणि दाखवला. या करारामुळे चिरस्थायी शांततेचा मार्ग मोकळा होईल, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास परवानगी मिळेल. इंधनाच्या किंमती कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिली. (Signing of the US-Iran peace agreement) इराणच्यावतीने अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वाक्षरी केली. या करारामध्ये युद्धविराम, आर्थिक सहकार्य, निर्बंधातील शिथिलता आणि इराणच्या अणुकार्यक्रमावरील भविष्यातील चर्चा, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे, अमेरिकेची नाकेबंदी हटवणे, असा आराखडा मांडला आहे. अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी ६० दिवसाची मुदत दिली आहे. (Signing of the US-Iran peace agreement