मास्को : रशियातील कजान शहरावर आज (दि.२१) सकाळी अमेरिकतील ९/११ पध्दतीने हल्ला झाला. न्यूज एजेंसी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनने ड्रोनने आठ हल्ले केले असून नागरी वस्तीतील सहा इमारतींना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसली तरी, अमेरिकेतील व्ट्निस् टॉवरवर झालेल्या हल्ल्याची आठवण जागी झाली. (Ukraine Attack)
सोशल मीडियावर या हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये काही ड्रोन इमारतीवर धडक मारत असल्याचे चित्र दिसत आहे. या हल्ल्यानंतर रशियातील दोन एअरपोर्ट बंद केले आहेत. २००१ मध्ये अतिरेक्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. त्यामध्ये तीन विमानांनी काही मिनिटाच्या अंतरांनी तीन इमारतींना लक्ष्य केले होते.
चार महिन्यांपूर्वी युक्रेनने रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता. रशियातील सारातोव शहरातील २८ मजली इमारत वोल्गा स्काईला लक्ष्य केले होते. त्याठिकाणी रशियाचा स्ट्रॅस्ट्रजिक बॉम्बर लष्करी तळ आहे. त्या हल्ल्यात चार व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना रशियाने युक्रेनवर १०० मिसाईल आणि १०० ड्रोनने हल्ला केला होता. त्यामध्ये युक्रेनचे सहा व्यक्ती ठार झाल्या होत्या. तर, १५० हून अधिक व्यक्ती जखमी झाले होते. (Ukraine Attack)
चार दिवसापूर्वी रशियाचा न्यूक्लियर चीफ इगोर किरिलोव हे मास्कोतील स्फोटात ठार झाले होते. किरिलोव अपार्टमेंटमध्ये बाहेर पडल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या स्कूटरमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात किरलोव यांचा असिस्टंटही ठार झाला आहे. या हत्येत युक्रेनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनबरोबर सुरु असलेले युध्द थांबवण्यास तयार असल्याचे सांगितले होते. अमेरिकेत सत्तांत्तर झाले असून डोनाल्ड ट्रम्प अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी झाले आहेत. पुतीन आणि ट्रम्प यांच्यात चांगले संबध आहेत. ट्रम्प यांची इच्छा असेल तर आपली त्यांच्याशी भेटण्याची तयारी असल्याचे पुतीन म्हणाले होते. ट्रम्प अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी विद्यमान बायडेन सरकार युक्रेनला शेवटची सेक्युरिटी असिस्टेंट इनिशिएट पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी युक्रेनने रशियावर ९/११ पद्धतीने ड्रोनने हल्ला केला आहे.
❗️Ukrainian drones attacked Kazan in three waves from different directions — Russian Mod
3 UAVs were destroyed by air defense systems, 3 more were suppressed by electronic warfare systems pic.twitter.com/MQ9Ryy5duu
— RT (@RT_com) December 21, 2024
हेही वाचा :