मुंबई : प्रतिनिधी : ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थापना केली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे आता जर मतभेद, वाद हे दूऱ् ठेऊन, मतभेदाचे जोडे बाहून काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट आणि शर्त टाकलेली नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट व महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंगतीला बसू नका. यात अट आणि शर्त नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. (No terms and conditions)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ‘वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे’ असे सांगून उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळीसाठी हात पुढे केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टाळी देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद शिवसेना उद्धव ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. (No terms and conditions)
संजय राऊत म्हणाले, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबर काम केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही काम केले आहे. आता उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचे ध्येय आहे. (No terms and conditions)
उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे, असे सांगून संजय राऊत म्हणाले, जे महाराष्ट्र हिताच्या अड येतील त्याला घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचे नाही. त्यांच्या पंक्तीलाही बसू नका आणि त्यांचे आगत स्वागत करु नका. यात चुकीचे काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला. आमच्या घरात मोरारजी देसाई यांचा फोटो आम्ही अजिबात लावणार नाही. महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदींचाही फोटो लावणार नाही. हे दोघेही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकाने महाराष्ट्र लुटला तर दुसऱ्याने महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या तोडला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोंडली. हे महाराष्ट्राचे शत्रू असून त्यांच्याबरोबर राहणारेही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर राहून कुणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. (No terms and conditions)
हेही वाचा :