नवी दिल्ली : दोन मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने बुधवारी (१३ ऑगस्ट) मुझफ्फरपूरच्या महापौर निर्मला देवी यांना नोटीस बजावली. (EC issues Notice to Mayor)
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावर हा आरोप केला होता. त्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगाने निर्मला देवी यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून १६ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.
‘‘वरील विषयासंदर्भात असे लक्षात आले आहे की २०२५ च्या विशेष सघन पुनरीक्षणादरम्यान, तुमचे नाव बूथ क्रमांक १५३, अनुक्रमांक ६६४, EPIC क्रमांक REM१२५१९१७, तसेच बूथ क्रमांक २५७, अनुक्रमांक ६१८, EPIC क्रमांक GSB१८३५१६४ येथील मसुदा मतदार यादीत नोंदले गेले आहे,’’ असे पत्रात म्हटले आहे. . (EC issues Notice to Mayor)
शिवाय, ‘‘असे देखील आढळून आले आहे की विशेष सघन पुनरीक्षणापूर्वीही, तुमचे नाव दोन्ही ठिकाणी नोंदवले गेले होते. म्हणून, वरील प्रकरणाच्या संदर्भात, तुम्हाला १६ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत तुमचे विधान/स्पष्टीकरण सादर करण्यात यावे जेणेकरून पुढील कारवाई करता येईल,’’ असे या नोटिसीत म्हटले आहे.
तेजस्वी यादव यांनी भारतीय जनता पक्षाते नेते आणि कार्यकर्त्यांना दोन मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) क्रमांक देऊन बिहारच्या मतदार यादीत फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केल्याच्या काही तासांनंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. . (EC issues Notice to Mayor)
‘‘आम्ही बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याबद्दल बोललो होतो. आता तुम्ही त्याला गुन्हा, चूक किंवा पर्दाफाश म्हणा, आम्ही ते आधीही सांगितले होते, पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणूक आयोग भाजपला मदत करत आहे आणि विरोधी पक्षांची मते कापत आहे. भाजपच्या लोकांना एकाच विधानसभेत एक नाही तर दोन ओळखपत्र क्रमांक दिले जात आहेत,’’ असा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.