नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी हरियाणात २५ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. तसेच एका ब्राझिलियन मॉडेलने वेगवेगळ्या नावाखाली एकाच मतदारसंघातील मतदार यादीत वीस ठिकाणी फोटो असल्याचा पुरावा सादर करुन खळबळ माजवली. (Theft in Haryana)
हरियाणात आठ पैकी एक मतदार बनावट
बोगस मतदानाबाबत राहूल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी केल्याचा दावा केला. हरियाणामध्ये ५.२१ लाख डुप्लिकेट मतदार, ९३ हजार १७४ अवैध मतदार, १९.२६ लाख बल्क मतदार असल्याचा दावा केला आहे. हरियाणा मतदार यादीत आठपैकी एक मतदार बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्याकडे एच फाइल्स हा शब्द आहे. आणि संपूर्ण राज्य कसे चोरीला गेले याबद्दल आहे. आम्हाला संशय होता की हे वैयक्तिक मतदारसंघामध्ये नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घडत आहे. (Theft in Haryana)
काँग्रेस विजयाचे रुपांतर पराभवात करण्याचे षढयंत्र
काँग्रेसच्या प्रचंड विजयाचे रुपांतर पराभवात करण्याचे षढयंत्र रचल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला. आम्हाला हरियाणामध्ये आमच्या उमेदवारांकडून काहीतरी चूक आहे, काम करत नाही अशा अनेक तक्रारी आल्या. त्यांचे सर्व अंदाज उलटे झाले. आम्ही मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातही हे अनुभवले. आम्ही हरियाणामध्ये जाऊन तिथे काय घडले याची तपशीलवार माहिती घेण्यास ठरवले आहे. भारतातील तरुण आणि सर्वसामान्यांनी स्पष्टपणे समजून घ्यावे असे वाटते कारण हे तुमच्या भविष्याबद्दल आहे. मी भारतातील निवडणूक आयोगावर, लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे तेही १०० टक्के पुराव्यासह करत आहे, असा दावा त्यांनी केला. (Theft in Haryana)
ब्राझिलियन मॉडेलचे २२ वेळा मतदान
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भांडाफोड करताना हरियाणा विधानसभा निवडणुकीत ब्राझिलियन मॉडेल असलेल्या एका महिने १० वेगवेगळ्या बूथवर वेगवेगळ्या नावांनी २२ वेळा मतदान केल्याचा दावा केला. सीमा, स्वीटी, सरस्वती, रश्मी, विमला या नावाने मतदान झाले आहे पण प्रत्यक्षात ती ब्राझिलियन मॉडेल असल्याचे स्पष्ट झाले.
पोस्टल व्होट आणि प्रत्यक्ष मतात फरक
राहुल गांधी यांनी हरियाणा मध्ये झालेल्या व्होटचोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत होते. सर्व पोलमध्ये काँग्रेसलाच विजय मिळताना दिसत होते. मात्र हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल व्होट आणि प्रत्यक्ष मतांमध्ये फरक दिसून आला.
पत्राद्वारे झालेल्या मतांमधील फरक लक्षात आल्यानंतर यामध्ये आम्ही खोलवर जाऊन तपास सुरु केला. तेव्हा आमचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आम्ही हे सर्व पुरावे शंभर वेळा तपासण्याचे ठरवले. ही जेन-झीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या मतांची चोरी होत आहे. आमचा सवाल निवडणूक आयोगाला आहे.