बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही राष्ट्रीय जनता दलाला कमी जागा का मिळाल्या? चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) या पक्षाला कमी मते मिळूनही त्यांच्या जागा जास्त का आहेत? असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पाच जागा मिळवल्या आहेत, त्यांचा फटका महागठबंधनला किती बसला आहे? अशा अनेक प्रश्नांची चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. (BJP AND AIMIM)
मुस्लिम मतांची विभागणी निर्णायक
मुस्लिम मतदार २०२० प्रमाणेच याहीवेळेस RJD कडे वळले नाहीत. मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी ओवैसी यांच्या AIMIM ला मतदान केले. AIMIM ने यावेळीही पाच जागा जिंकल्या. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे एमआयएमने किमान वीस जागांवर RJD चं नुकसान केलं. एमआयएमला भाजपची बी टीम उगाच म्हणत नाहीत. मोक्याच्या ठिकाणी ओवेसी भाजपला मदत करीत असतात. (BJP AND AIMIM)
अल्पसंख्यांक (मुस्लिम) मतांचं विभाजन विरोधकांसाठी किती घातक ठरू शकतं, हे बिहारच्या निवडणुकीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
पूर्व बिहारच्या सीमांचल भागात AIMIMच्या अनपेक्षित वाढीमुळे, या मुस्लिमबहुल जागांवर महागठबंधन (MGB) च्या उमेदवारांचा पराभव झाला.
या मतविभाजनाचा थेट फायदा एनडीएला मिळाला, आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला. (BJP AND AIMIM)
AIMIM ची सीमांचलमध्ये घुसखोरी
AIMIM ने एकूण 25 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बहुतांश जागा सीमांचल क्षेत्रातील होत्या. मुस्लिम लोकसंख्या ४०% पेक्षा जास्त आहे, अशा नऊ जागांवर एमआयएमने लक्षणीय मते घेतली. याठिकाणी AIMIM मुळे महागठबंधनाचे उमेदवार हरले. किशनगंजमध्ये काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली. RJD आणि CPI(ML)-लिबरेशन यांना एकही जागा मिळाली नाही. (BJP AND AIMIM)
ज्या भागांत मुस्लिम लोकसंख्या २५ ते ४० % आहे, त्या १३ जागांपैकी १२ जागांवर NDA ने विजय मिळवला. यात: BJP — ६, JDU — ५ आणि LJP (रामविलास) — एक जागा मिळाली. महागठबंधनमधील फक्त RJD ला एका जागेवर विजय मिळाला.
AIMIM चा वाढलेला वोट शेयर
AIMIM ने ९ जागांवर १५% पेक्षा जास्त मते घेतली. तर आठ जागांवर ५% ते १५% मते मिळवली. या वाढलेल्या AIMIM मतांमुळे महागठबंधनला फटका बसला. (BJP AND AIMIM)
२०२० मध्येही AIMIM ने सीमांचलमध्ये पाच जागा जिंकून सगळ्यांना धक्का दिला होता. नंतर त्यापैकी चार आमदार RJD मध्ये सामील झाले. २०२५ मध्ये पुन्हा एकदा असेच चित्र दिसले — AIMIM मुळे मुस्लिम मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा NDA ला मिळाला.
AIMIM ने या निवडणुकीत मुस्लिम समाजात सेक्युलर पक्षांबद्दल निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा एमआयएमने घेतला. पक्षाने जोरदार प्रचार करून असा संदेश दिला की: मुस्लिमांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही. सेक्युलर पक्ष मुस्लिमांना सत्ता किंवा राजकीय वाटा देण्यास तयार नाहीत.
सीमांचल भागात AIMIM चे संघटन आधीपासूनच मजबूत असल्यामुळे पक्षाला चांगले यश मिळाले. (BJP AND AIMIM)
महागठबंधनाची रणनीती फसली
या निकालांतून स्पष्ट झाले की, अल्पसंख्यांक मतांना एकत्र आणण्यात महागठबंधन अपयशी ठरले. मतविभाजनाचा फायदा मोठ्या पक्षांनाच होतो. विरोधी पक्षांकडे मुस्लिम किंवा इतर विशिष्ट समुदायांसाठी स्पष्ट रणनीती नव्हती. (BJP AND AIMIM)
AIMIM पुन्हा मजबूत कशी झाली?
२०२० मध्ये AIMIM ने पाच जागा जिंकल्या होत्या, पण नंतर: ४ आमदार RJD–काँग्रेसमध्ये गेले. असे होऊनही २०२५ मध्ये AIMIM पुन्हा प्रभावीपणे परत आली आहे. याचा अर्थ असा की सीमांचलमधील मतदारांनी यावेळी मतदान काही वेगळ्या निकषांवर केले.
AIMIM ची सुरुवात तेलंगाना राज्यात झाली. तेलंगानाबाहेर पक्षाने उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली यांसारख्या राज्यांत कधीही १% पेक्षा जास्त मते मिळवले नाहीत. पण बिहार हा अपवाद ठरला. २०२० मध्ये पक्षाचा वोट शेयर — १.२४% होता. २०२५ मध्ये तो सुमारे २% आहे. AIMIM ने बिहारमध्ये स्वतःचे राजकीय अस्तित्व क्रमशः वाढवत नेले आहे. त्याचा फटका भाजपविरोधी पक्षांना आणि फायदा स्वाभाविकपणे भाजप आणि मित्रपक्षांना झाला आहे. (BJP AND AIMIM)
मते जास्त जागा कमी कशामुळे?
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब झाले. इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाच्या करारानुसार RJD ने १४३ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २५ जागांवरच आरजेडीला विजय मिळू शकला. जागा कमी मिळाल्या असल्या तरी RJD ने सर्व पक्षांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. दुर्दैवानं जास्त टक्केवारी मिळवूनही त्या प्रमाणात जागा आणि सत्ताही मिळत नाही.
२०२५च्या विधानसभा निवडणुकीत RJD ला २३% मते मिळाली. २०२० मध्ये हे प्रमाण २३.११% होते. म्हणजे या वेळेस किंचित घट झाली आहे. मागील निवडणुकीत पक्षाने १४४ उमेदवार उभे केले होते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजपची मतांची टक्केवारी २०२० मध्ये १९.४६% होती, ती या निवडणुकीत वाढून २०.०७% झाली. २०२५ मध्ये BJP ने आघाडीच्या करारानुसार १०१ जागा लढवल्या होत्या, तर २०२० मध्ये ११० जागा लढवल्या होत्या.
सर्वाधिक मते मिळूनही पराभव का?
वोट शेयर म्हणजे एकूण मतदानाच्या तुलनेत एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला मिळालेली टक्केवारी. मतांची टक्केवारी अधिक असणे म्हणजे त्या पक्षाला लोकांचे समर्थ अधिक मिळणं. पण जागा जिंकण्यासाठी मतं योग्य प्रमाणात मिळणं महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी मोठ्या अंतरानं जागा जिंकल्या तरी मतांची संख्या आणि टक्केवारी वाढू शकते. त्याऐवजी सगळीकडं मतं मिळणं गरजेचं असतं.
RJD चा वोट शेयर जास्त का आला?
अनेक जागांवर आरजेडी पक्ष दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. म्हणजे त्या जागांवर मतं तर मिळाली, पण ती जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळं एकूण मतांची टक्केवारी वाढली. पण जिंकलेल्या जागा वाढल्या नाहीत.
असंही म्हणता येईल की RJD चा जिथं पराभव झाला,तिथंही आरजेडीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली, पण ती दुस-या क्रमांकाची होती. त्यामुळं ते मतदान व्यर्थ गेलं. तसेच RJD च्या पराभवाला अनेक कारणं होती. त्यातले सर्वात मोठं कारण म्हणजे महिलांनी नीतिश कुमार आणि एनडीएला दिलेलं समर्थन. लाखो महिलांच्या खात्यावर निवडणुकीआधी दहा हजार रुपये जमा करण्यात आले. याचा NDA ला मोठा फायदा झाला.
महागठबंधन मधील पक्षांचं खराब प्रदर्शन
RJD शिवाय आघाडीतील इतर पक्षांचीही अवस्था वाईट होती: काँग्रेसनं लढलेल्या ६१ जागांपैकी फक्त ६ जागा जिंकल्या. CPI(ML)L — 2 जागा, CPI(M) ला एक जागा मिळाली आणि CPI सा एकही जागा मिळाली नाही. मुकेश सहनी आणि आयपी गुप्ता यांच्या पक्षांचाही विशेष फायदा झाला नाही. यामुळे संपूर्ण महागठबंधन मिळून फक्त ३५ जागांवर आटोपले.
NDA ची जोरदार कामगिरी
NDA ने एकूण २०२ जागांवर विजय मिळवला.
BJP — ८९ जागा, JDU ८५, LJP (राम विलास) १९, HAM ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चा ४जागा. अशा सर्व पक्षांना जागा मिळाल्या. एकूण NDA ने प्रभावी कामगिरी केली.
LJP विरुद्ध RJD – एक महत्त्वाचा विरोधाभास
RJD ला सर्वाधिक 23% मते मिळाली. तरी फक्त 25 जागा. आणि LJP (राम विलास) ला फक्त ४.९७% मतं मिळाली. पण त्यांनी जागा जिंकल्या १९. म्हणजेच RJD ची मतं राज्यभर विखुरलेली होती. पण LJP ची मतं ठराविक काही जागांवर प्रचंड केंद्रित होती. आणि निवडणूक गणित सांगते: जिंकण्यासाठी जास्त मते असणे आवश्यक नाही; त्या मतांचा योग्य जागांवर केंद्रित उपयोग होणं अधिक महत्त्वाचं असतं.