मुंबई : प्रतिनिधी : शाळेतील ४० वर्षीय शिक्षिकेने १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील दादर परिसरात शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संशयित शिक्षिकेवर बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आली असून तिला अटक केली आहे. (Teachers torture of student)
मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षभरापासून शिक्षिका पिडित विद्यार्थ्यासोबत बळजबरीने शारीरिक संबध ठेवत होती. त्यामुळे पिडित विद्यार्थी तणावात होता. विद्यार्थ्याची स्थिती लक्षात आल्यावर पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. मुलाने घडलेले प्रकार सांगितल्यावर पालक हादरुन गेले. त्यांनी पोलिस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली. (Teachers torture of student)
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थी शिक्षिकेचा संपर्कात आला. डिसेंबर २०२३ मध्ये स्नेहसंमेलन झाल्यावर जानेवारी २०२४ मध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षिका इतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करत होती. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी तणावात होता. (Teachers torture of student)
पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार शिक्षिकेने पीडित विदयार्थ्यांला पंचतारांकित हॉटेल आणि निर्जनस्थळी नेऊन वाहनामध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्या काही गोळ्या खाण्यासाठी देत होती. या सर्व प्रकारामुळे पीडीत विद्यार्थी अबोल झाला होता. तो कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशी बोलत नव्हता. कुटुंबियांनी त्यांच्याशी संवाद साधला. झालेल्या घटना समजताच कुटुंब हादरुन गेले. त्यावेळी संबधित मुलगा दहावीत शिकत होता. लोकलज्जेखातर कुटुंबियांनी कुठेही त्याची वाच्यता केली. दहावी झाल्यानंतर संबधित शिक्षिका विद्यार्थ्यांचा पिच्छा सोडेल अशी त्यांना आशा होती. पण पीडित मुलगा उत्तीर्ण झाल्यावरही शिक्षिका विद्यार्थ्याकडे पाठपुरावा करत होती. अखेर पोलिसांनी तक्रार देण्याचा कुटुंबाने निर्णय घेतला. शिक्षिकेवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून शिक्षिकेला अटक केली आहे. (Teachers torture of student)