- विजय चोरमारे
सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधकांना अक्षरशः जेरीस आणले. विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगरींचे विश्लेषण करताना राहुल गांधी यांनी सत्ताधा-यांच्या वर्मावर घाव घातला. इडियट कोण आणि अंधभक्त कोण, असा प्रश्नही त्यांनी सर्वांच्या मनात निर्माण केला. (Student, Idiot and Andhbhakt)
इडियट शब्द असंसदीय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर जोरदार भाषण केलं. विद्यार्थ्यांच्या संदर्भातील एका उदाहरणाद्वारे केलेल्या ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ या शब्दांच्या वापरावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्षांनी ‘इडियट’ हा शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.
एका विद्यार्थिनीशी झालेल्या संवादाचा दाखला देत राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, काही लोकांना आपल्याला सगळंच कळतं, असा ठाम विश्वास असतो, असं ती विद्यार्थिनी म्हणाली. (Student, Idiot and Andhbhakt)
“त्यांना वाटतं की ज्ञान त्यांच्याच आतून येतं. ते स्वतःला देव समजतात. एखाद्या व्यक्तीला जे काही माहीत असायला हवं, ते सर्व आपल्याला माहीत आहे, असं ते मानतात. ते अहंकारी असतात, इतरांचं ऐकत नाहीत आणि दुसऱ्यांचं कितीही खरं असलं तरी ते मानायला तयार नसतात. ” असं त्या विद्यार्थिनीचा दाखला देत राहुल गांधी यांनी सांगितलं.
“मी तिला विचारले, अशा लोकांना तू काय म्हणतेस? त्यावर ती म्हणाली, ‘मी त्यांना इडियट म्हणते,'”
राहुल गांधी असं म्हणताच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला. (Student, Idiot and Andhbhakt)
हेही वाचाः राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह
विरोधी पक्षनेत्यांनी असंसदीय शब्दांचा वापर करू नये, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी केली. त्यावर राहुल गांधी यांनी आपलं म्हणणं पुढं सुरू ठेवलं.
‘विद्यार्थी म्हणजे शिकण्याची वृत्ती असलेली व्यक्ती’ आपलं भाषण पुढं सुरू ठेवत राहुल गांधी यांनी सांगितलं की, जगात दोन प्रकारचे विद्यार्थी असतात.
विद्यार्थी म्हणजे काय
“शेतकरी विद्यार्थी असू शकतो, वकील, डॉक्टरही विद्यार्थी असू शकतात. विद्यार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची इच्छा असते, जो इतरांचा आदर करतो,” असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा ‘इडियट’ या शब्दाचा उल्लेख करत, “असे लोक कुणाचंही ऐकत नसल्याचं सांगितलं. यावर पुन्हा सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला.
त्यावर राहुल गांधी यांनी, “मी तुमच्याबद्दल बोलत नाही.” असा टोमणा मारला.
दोन्हीकडच्या सदस्यांमध्ये वाद सुरू असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विषयांतर न करता संबंधित विधेयकावर बोलण्यास सांगितलं.
त्यावर राहुल गांधी यांनी, “मी विधेयकावरच बोलत आहे. विद्यार्थी म्हणजे काय, हे स्पष्ट करत आहे.” असं सांगितलं.
हेही वाचाः राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..
गोंधळातच राहुल गांधी यांनी भाषण पुढं सुरू ठेवलं. (Student, Idiot and Andhbhakt)
“तिसरी कॅटेगरी म्हणजे ‘अंधभक्त’ कुठं बसतो?” असं आपण त्या विदयार्थिनीला विचारल्याचं राहुल म्हणाले.
त्यावर अंधभक्त इडियटला फॉलो करीत असतो, असं त्या विद्यार्थिनीनं सांगितलं.
एवढं सगळं सांगून राहुल गांधी म्हणाले, “म्हणून तीन कॅटेगरी आहेत.—विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त.” (Student, Idiot and Andhbhakt)
इडियट शब्दावरून गोंधळ सुरू असतानाच सभागृहाचे उपनेते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधी यांना आपले भाषण पूर्ण करू द्यावे, अशी विनंती केली. त्याचवेळी त्यांनी अध्यक्षांना ‘इडियट’ हा शब्द सभागृहाच्या अधिकृत कामकाजातून वगळण्याची मागणी केली.
काल प्रियांका, आज राहुल
काल प्रियांका गांधी यांनी सरकारची पिसं काढली होती. प्रियांका गांधी यांच्या भाषणानं सत्ताधा-यांना पुरतं नामोहरम करून टाकलं होतं. त्यांचं भाषण प्रचंड आक्रमक आणि गंभीर स्वरुपाचं होतं. विद्यार्थ्यांवर पॅलट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला, विद्यार्थी हे दहशतवादी होते का, असा प्रश्न त्यांनी विचारला. वोट चोरी, दान चोरी, उद्योगपती मित्रांसाठी सरकारी संपत्तीची चोरी, शेतक-यांच्या जमिनीची चोरी करणा-या सरकारनं आता देशातील युवकांच्या स्वप्नांची चोरी केल्याचा घणाघात केला.
कालचा दिवस प्रियांका गांधी यांनी गाजवला असताना आजच्या दिवसावर राहुल गांधी यांनी मोहोर उमटवली. प्रियांका गांधी यांनी आक्रमकपणे हल्ला केला, तर राहुल गांधी यांनी गुदगुल्या करून सरकारचा जीव काढला.
शब्दांभोवती फिरवत ठेवले
विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन शब्दांभोवती खेळवत सत्ताधा-यांना हैराण केलं. देशाच्या राजकारणात गेली बारा वर्षे चर्चेत असलेल्या अंधभक्त या संकल्पनेला संसदीय व्यासपीठावर चर्चेत आणलं. त्याचवेळी हे अंधभक्त ज्याला फॉलो करतात, ती व्यक्ती म्हणजे इडियट…. असं म्हणून त्यांनी जो निशाणा साधला, ते म्हणजे सत्ताधा-यांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार. पण काही करू शकत नव्हते. (Student, Idiot and Andhbhakt)
इडियट हा असंसदीय शब्द आहे यापलीकडं त्यांचा आक्षेप जाऊ शकला नाही. त्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हातातल्या पुस्तकाचा दाखला देत होते. हे पुस्तक आमच्या सरकारनं तयार केलेलं नाही असं सांगत होते. म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळातच इडियट हा शब्द असंसदीय शब्द म्हणून नोंद झाल्याचं सांगत होते.
हेही वाचाः Rahul Gandhi’s ‘weak PM’ jibe : दुबळा पंतप्रधान; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
सत्ताधारी त्या एका शब्दाच्या संसदीय असण्या-नसण्यापलीकडच्या अर्थाकडं जाऊ शकत नव्हते. पण त्यांना नेमकं कळलं होतं, की राहुल गांधींना काय म्हणायचं आहे – ते अधभक्त कुणाला म्हणताहेत आणि इडियट कुणाला म्हणताहेत.
अमित शाह यांच्यावर हल्ला
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान थेट गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं. आज या चर्चेवेळी अमित शाह इथं असते तर आनंद झाला असता, पण ते घाबरून आले नसल्याचं ते म्हणाले. त्यावर विषय त्यांच्या खात्याचा नसल्याचं अध्यक्षांनी निदर्शनास आणलं. त्यावर राहुल गांधी पुन्हा म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लाठीमार, पॅलट गनमधून हल्ले अमित शाह यांच्या आदेशानुसार झाले.
हा घावही सत्ताधा-यांच्या वर्मी लागला. आणि तुमच्याकडं काय पुरावा आहे, अशी त्यांनी विचारणा केली. राहुल गांधी यांच्या या आरोपावरही प्रचंड गदारोळ झाला नसला तर नवल.
शिक्षण व्यवस्थेवर आरएसएसचा कब्जा
केंद्रीय शिक्षण मंत्रालय प्रत्यक्षात तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान चालवत नव्हते, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चालवत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरएसएसच्या विचारसरणीशी संबंधित व्यक्तींना कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आरएसएस विद्यार्थ्यांना ‘अंधभक्त’ बनवू इच्छित होती आणि आंदोलन करणारे विद्यार्थी याच विचारसरणीविरोधात संघर्ष करत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. (Student, Idiot and Andhbhakt)
ही परीक्षा व्यवस्था नाही, तर खंडणीखोर व्यवस्था आहे. प्रामाणिक विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिक्षण व्यवस्थेवर कब्जा केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शिक्षणावरील वाढत्या खर्चाचा मुद्दा
राहुल गांधी यांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांवरील वाढत्या आर्थिक भाराचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. ते म्हणाले की, आज देशात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी इतकी महाग झाली आहे की, गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांना मुलांच्या कोचिंगचा खर्च आणि अर्ज शुल्क भरण्यासाठी आयुष्यभराची बचत, जमीन किंवा दागिने गहाण ठेवावे लागतात.
दुसरीकडे, NEET किंवा CUETसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आयोजित करण्यासाठी सरकारही करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. अशा मोठ्या आर्थिक खर्चानंतरही परीक्षेच्या ऐनवेळी प्रश्नपत्रिका फुटल्यास केवळ सरकारी निधीच वाया जात नाही, तर लाखो कुटुंबांवरही मोठा आर्थिक आघात होतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशभरात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील १५० हून अधिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. त्यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत सापडले आहे.
पारदर्शक, आधुनिक परीक्षा पद्धती
प्रत्येक मोठ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बाजारात विकली जात असताना सरकारची परीक्षा व्यवस्था पूर्णपणे अपयशी का ठरत आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. एवढ्या मोठ्या गैरव्यवहारानंतरही मुख्य सूत्रधारांपैकी किती जणांना कठोर शिक्षा झाली, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
परीक्षा व्यवस्थेत सुधारणा सुचवत राहुल गांधी म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेत अद्यापही पारदर्शक आणि आधुनिक परीक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत नाही, ही चिंतेची बाब आहे. (Student, Idiot and Andhbhakt)
GMAT आणि SATसारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांच्या धर्तीवर भारतातही प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाच्या पडद्यावर वेगवेगळे आणि रँडम प्रश्न देण्याची पद्धत, तसेच सुरक्षित डिजिटल मूल्यमापन प्रणाली लागू केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याशिवाय प्रश्नपत्रिका फुटीच्या रॅकेटवर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
एकूणच सत्ताधा-यांना जेरीस आणत आणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणेसाठी गंभीर मुद्देही सुचवले आणि शिक्षणाबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखवून दिलं. तरीही शेवटी लक्षात राहिले ते इडियट आणि अंधभक्त. राहुल गांधी यांनी ही विशेषणं कुणासाठी वापरली असावीत, असं तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्स