नवी दिल्ली : प्रतिनिधी : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या कोणत्या गटाला द्यायचे या याचिकेवर १२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भुयान आणि एन.के.सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि पक्षाचे पारंपरिक चिन्ह धनुष्यबाण देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली आहे.
आज बुधवारी सुनावणी होऊन चिन्हाबाबत लवकर निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता ही सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी यावर निकाल लागणार का याकडे दोन्ही शिवसेनेचे लक्ष लागले आहे. (ShivSena’s hearing in November)
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जानेवारीमध्ये होणार असल्याचे तातडीची गरज म्हणून सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला उत्तर देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, आम्ही १२ नोव्हेंबरला यावर सुनावणी घेऊ. सिब्बल यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिलेल्या आव्हान देणाऱ्या याचिकांची यादी तयार करण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, आपात्रतेचा मुद्दा दुसऱ्या खंडपीठासमोर सुचीबद्ध आहे याकडे लक्ष वेधले. दोन्ही प्रकरणे एकत्रितपणे सुचीबद्ध करण्यासाठी मुख्य न्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्याला सिब्बल यांनी सहमती दर्शवली. एकनाथ शिंदे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. (ShivSena’s hearing in November)