मुंबई : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन लढत होते का? तेही मांसाहारच करत होते. पेशवेदेखील मांसाहार करत होते. आता सीमेवरच्या सैन्यालादेखील मांसाहार करावाच लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या, तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती संपवत आहात.” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. (Ban on sale of fish)
नागपूरसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीवर बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. या प्रश्नांवर खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईसारख्या शहरात मांसमच्छी खाणाऱ्यांना अनेक ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. घर विकले जात नाही, यावर सध्या संघर्ष सुरूच आहे. अशातच महानगरपालिकेने 15 ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी घातली आहे. १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, कोणताही धार्मिक सण नाही. मग, १५ ऑगस्टला मांसविक्रीवर बंदी कशासाठी?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. (Ban on sale of fish)
“१५ ऑगस्ट हा शौर्याचा दिवस आहे. तुमच्याकडे मागणी केली कोणी? स्वातंत्र्य दिनी मांसाहार वर्ज्य हे काय नवीन थोतांड आहे. या महाराष्ट्रामध्ये या थोतांडाचे जनक कोण आहेत?” असा सवाल शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री महाराष्ट्राला नपुसंक बनवत आहात. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन लढत होते का? तेही मांसाहारच करत होते. पेशवेदेखील मांसाहार करत होते. आता सीमेवरच्या सैन्यालादेखील मांसाहार करावाच लागतो. देवेंद्र फडणवीस, हे फतवे मागे घ्या, तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती संपवत आहात.” असे म्हणत टीका केली. (Ban on sale of fish)
रेडे कापून आलेलं सरकार
“महायुतीचे सरकार रेडे कापून सत्तेत आले आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला गेला. कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये रेडे, बकरे कापून सत्तेत आलेल्यांना मांसाहाराचा तिटकारा का यावा?” असा सवाल शिवसेना खासदार राऊत यांनी यावेळी केला. “रेडे कापल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून सुद्धा खावा लागतो ही तेथील परंपरा आहे,” असा दावा त्यांनी यावेळी केला. “इतर प्राणी सुद्धा त्या ठिकाणी कापले जातात आणि त्यानंतर मांसाहार करावा लागतो. अशा सरकारचे जनक फडणवीस जर शाकाहारी व्हा म्हणून सांगत असतील तर थोतांडपणा बंद करा” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
“स्वातंत्र्यदिनी मांसाहार करायचा नाही, तुम्ही नका खाऊ. तुम्ही लपून खात आहात. मग लोकांवर बंदी का लादता? हा देश आहे की बंदीशाळा? हे बंदीराष्ट्र झाले आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदिशाळा बनवली असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.