पुणे : प्रतिनिधी : रायगडावर सहा जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ‘माझा गड माझी जबाबदारी’ हे तत्त्व स्वीकारून गडावर प्लास्टिक कचरा होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक माजी खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. (Shivrajyabhishek)
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. युवराज्ञी संयोगिताराजे व शहाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजीनगरमधील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात बैठक झाली.
संभाजीराजे म्हणाले, “शिवराज्याभिषेक लोकोत्सव झाला असून, सुमारे पाच लाख शिवभक्त गडावर येत असतात. या सोहळ्याची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. समिती व प्रशासन यांच्यात चांगला समन्वय असून, शिवभक्तांना कोणतीच अडचण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.” २५ जूनला रायगडावर लाइट अँड साऊंड शोची चाचणी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (Shivrajyabhishek)
संयोगीताराजे म्हणाल्या, “छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी पिढी घडली पाहिजे. शिवभक्तांनी सोहळ्यात निष्ठेने काम करण्यासाठी पुढे यायला हवे.” या वेळी समिती अंतर्गत विविध समित्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. अॅड. स्वप्नील वाळूज, गणेश मोरे, प्रतिक देशमुख, दत्ता वाघ, निलेश पवार, अनिकेत देशमाने, धनंजय भुजबळ,पुष्कर काशीकर, डॉ. संजय पाटील, शुभम मुठाळ यांनी सुचना मांडल्या.
या वेळी देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे, विश्वस्त विक्रमसिंह मोरे, प्रशांत मोरे, राजेंद्र कोंढरे, अप्पासाहेब कुर्डे, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, सत्यजित भोसले, प्रशांत दरेकर, चैत्राली कारेकर, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, उदय घोरपडे, प्रवीण पोवार, संजय पवार, प्रवीण हुबाळे, विकास देवाळे, भरत कांबळे, गजानन देशमुख, वरुण भांबरे, सचिन वरपे, डॉ. धनंजय जाधव, माधव देवरसकर, विनोद साबळे उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (Shivrajyabhishek)
धातूच्या बाटल्या वापरा
गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक बाटल्या आणल्या जातात आणि त्या गडावर फेकल्या जातात. त्यामुळे गडावर कचरा होतो. शिवभक्तांनी प्लास्टिकऐवजी धातुची बाटली वापरावी, असे आवाहन युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी केले.
ऐंशी कोटी रुपयांच्या निधीस तत्वतः मान्यता
रायगडावर पिण्याच्या पाण्याची दरवर्षी अडचण निर्माण होते. त्यासाठी शासनाकडे ऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या दोन वर्षांत पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
sambhajiraje
कोल्हापूर : प्रतिनिधी : किल्ले रायगडावरील शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. (Sambhajiraje demand)
माजी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. (Sambhajiraje demand)
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. (Sambhajiraje demand)
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. (Sambhajiraje demand)
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरची वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली आहे. (Sambhajiraje demand)
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे. (Sambhajiraje demand)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे. तसेच महासंचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली आणि प्रादेशिक संचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई यांनाही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याचे निवेदन पाठवले आहे. (Sambhajiraje demand)
हेही वाचा :
बीड : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके शनिवारी केला. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले. (Beed Morcha)
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले, पण अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. मोर्चात सर्व पक्षांतील आमदा उपस्थित होती. मोर्चात वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करण्यात आली.(Beed Morcha)
यावेळी आमदार सोळंके म्हणाले, देशमुख हत्या प्रकारणातील काही आरोपी मोकाटच आहेत. खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. गेली चार वर्षे धनंजय मुंडे पालकमंत्री होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपद भाड्याने दिले.
ते म्हणाले, पालकमंत्र्यांचे अधिकार मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन आणि प्रशासनावर जरब बसवली. फोन करुन पोलिस ठाण्यात कुणालाही अडकवायला सांगायचे. हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले. ते परळी तालुक्यात गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा करतात. या हायवा कोणाच्या आहेत? या सर्व गोष्टीला ज्यांनी वाल्मिक कराडच्या पाठिमागे शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे सरकारमध्ये असतील तर कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आजचा मोर्चा आमचे पहिले पाऊल आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही सोळंके यांनी यावेळी दिला.(Beed Morcha)
ही आमच्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुणा कहाणी नाही म्हणत नाही. तिची तर कहाणी वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय, असे सांगून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी पुन्हा केली.
मुंडेंचा राजीनामा घ्या : संभाजीराजे
माजी खासदार संभाजीराजे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तुम्ही परखड आहे म्हणता मग त्यांना संरक्षण देता, ते तुम्हाला पटतेय का, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी खऱ्या आरोपीला अटक करून दाखवावी. कराडला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठे आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे.
आव्हाडांचा गौफ्यस्फोट
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा हवाला देत ते म्हणाले की, बीडमध्ये असताना नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरे काय माहीत नाही. पण या अधिकार्याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
हेही वाचा :