मुंबई : विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. त्यांचा जीव घेण्याचा हा प्रयत्न होता. या घटनेतील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (१४ जुलै) विधानसभेत केली. (Vadettiwar demands strict action)
याबाबत संबंधित सातजणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उतरादखल बोलताना दिली.
रविवारी झालेल्या या हल्ल्याच्या घटनेवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. (Vadettiwar demands strict action)
वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावर अमानुषपणे हल्ला झाला. हा हल्ला करणाऱ्यांचा म्होरक्या एका सत्तारूढ पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे. चुलत भावाची हत्या केल्याच्या गुन्ह्यात त्याने तुरुंगवासही भोगला आहे. एका पक्षाचा तो कार्यकर्ता आहे, पण ह्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हल्ला होणार याची माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती का? या कार्यक्रमात पोलिस बंदोबस्त का नव्हता? असा सवाल करत यांच्यासाठी कायदा नाही का? गायकवाड हे निर्भिडपणे काम करत आणि त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे त्यामुळे कठोर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली. (Vadettiwar demands strict action)
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी सबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, संभाजी हे नाव एकेरी पद्धतीने दिले आहे, या कारणावरून त्यांना आक्षेप घेतला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणात सर्वावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (Vadettiwar demands strict action) दरम्यान, अधिवेशनाच्या आवारात याबाबत बोलताना शरद पवार गटाचे आ. रोहित पवार म्हणाले,’ हल्लेखोर दिलीप काटे हा सराईत गुन्हेगार असून भाजपाचा पदाधिकारी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून हल्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल होती, असे सांगण्यात येत आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा :
पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने संतापाची लाट