मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. तर कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनीही वृक्षतोड होणार असा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यममार्ग काढण्याची तयारी दर्शवली असताना महायुतीतील उप मुख्यमंत्री अजित पवार यांनीही तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यांनी सयाजी शिंदे या भूमिकेला पाठिंबाही दिला आहे. (Ajit Pawar’s opposition to tree cutting)
एकीकडे साधुग्रामसाठी तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय घेतला असताना नाशिक महानगरपालिकेने या जागेवर पीपीपी तत्वावर प्रदर्शन केंद्र, बॅक्वेट हॉल, रेस्टॉरंट उभारण्यासाठी २२० कोटी रुपयांचे टेंडर प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे तपोवनातील वृक्षतोंडीचा वाद चिघळला आहे. त्यातच अजित पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करुन तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला आहे. (Ajit Pawar’s opposition to tree cutting)
अजित पवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, “तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे”. उप मुख्यमंत्री अजित पवारांनीच तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केल्याने महायुतीतील विसंवाद समोर आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकीत तपोवन हा मुद्दा गाजणार आहे. (Ajit Pawar’s opposition to tree cutting)