कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष आणि सहा वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत खाजगी परदेश दौऱ्यासाठी सरकारच्या निधीचा वापर केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. (Wickremesinghe arrested)
‘‘सप्टेंबर २०२३ मध्ये लंडनला भेट दिल्याबद्दल श्रीलंका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) शुक्रवारी सकाळी (२२ ऑगस्ट) श्री. विक्रमसिंघे यांची चौकशी केल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द हिंदूला सांगितले. ‘‘त्यांना आज कोलंबो फोर्ट मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाईल,’’ असे अधिकाऱ्याने सांगितले. (Wickremesinghe arrested)
आर्थिक मंदीमुळे देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पद सोडले. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये झालेल्या तातडीच्या संसदीय मतदानात विक्रमसिंघे यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.