लंडन : मूळ भारतीय आणि शिक्षण वा नोकरीनिमित्त ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असलेल्या भारतीयांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना एका ब्रिटीश शीख महिलेच्याबाबतीत घडली आहे. तू आमच्या देशाची नाहीस असे म्हणत तिच्यावर कथितरित्या बलात्कार करण्यात आला. (Sikh woman raped)
ही घटना समजताच यूके पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली. हल्लेखोरांच्या माहितीसाठी आवाहन सुरू केले. हा हल्ला ‘वांशिकदृष्ट्या गंभीर हल्ला’ म्हणून हाताळला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी वेस्ट मिडलँड्समधील सँडवेल येथील ओल्डबरी येथील टेम रोडवर एका २० वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे.(Sikh woman raped)
‘‘ओल्डबरी येथे एका महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. आम्ही चौकशी करत आहोत. आमच्यादृष्टीने हा वांशिकदृष्ट्या गंभीर हल्ला आहे आणि आम्ह तपास करत आहोत,’’ असे वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी एका निवेदनात म्हटले असल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले आहे.
‘‘हल्ल्यादरम्यान तिच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली होती, असे या महिलेने आम्हाला सांगितले. आम्ही सध्या ही एक गंभीर आणि अपवादात्मक घटना म्हणून या घटनेकडे पाहत आहोत,’’ असे निवेदनात पुढे म्हटले आहे.(Sikh woman raped)
हल्लेखोर दोघा संशयितांपैकी एकाने मुंडण केले होते. दोघेही गोरे आणि धष्टपुष्ट शरीरयष्टीचे आणि हातमोजे घातलेले होते, असे या महिलेने सांगितले. हा भयंकर हल्ला आहे. या घटनेने पीडितेला मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्मेथविकचे खासदार गुरिंदर सिंग जोसन यांनी केली आहे.