विक ॲन झी : भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञनंदाने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रज्ञनंदा आणि भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश हे तेराव्या फेरीअखेर ८.५ गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर होते. त्यामुळे ब्लिट्झ लढतींच्या आधारे विजेता ठरवण्यात आला. या लढतींत प्रज्ञनंदाने गुकेशवर २-१ अशी मात करून विजेतेपदावर नाव कोरले. (Chess)
या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीपासूनच प्रज्ञनंदा आणि गुकेश हे आलटून पालटून आघाडीवर होते. बाराव्या फेरीअखेर या दोन्ही बुद्धिबळपटूंचे प्रत्येकी ८.५ गुण झाले होते. त्यामुळे, त्यांच्या अखेरच्या फेरीतील निकालावर सर्वांचे लक्ष होते. तथापि, तेराव्या फेरीमध्ये या दोघांनाही धकादायकरीत्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या अर्जुन एरिगैसीने गुकेशवर मात केली, तर जर्मनीच्या व्हिन्सेंट किमेरने प्रज्ञनंदाला पराभूत केले. त्यामुळे, गुकेश व प्रज्ञनंदाचे गुण समान राहिले. परिणामी, स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी तीन ब्लिट्झ लढतींच्या टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. (Chess)
टायब्रेकरमधील पहिली ब्लिट्झ लढत जिंकून गुकेशने आघाडी घेतली होती. मात्र, प्रज्ञनंदाने त्यानंतरच्या लागोपाठ दोन लढतींमध्ये विजय नोंदवला. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रज्ञनंदा म्हणाला, “मी स्पर्धेत सहभागी झालो, तेव्हा विजेतेपद जिंकण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि, प्रतिस्पर्धी तुल्यबळ असल्याने स्पर्धा अटीतटीची झाली. अखेरच्या फेरीत अर्जुन गुकेशवर मात करेल, असे मला वाटले नव्हते. मात्र, मीसुद्धा त्या फेरीत पराभूत झाल्यामुळे आम्हाला टायब्रेकर लढती खेळाव्या लागल्या. अखेर मी विजयी ठरलो, याचा मला खूप आनंद आहे.” (Chess)
दरम्यान, भारताचा पेंटाला हरिकृष्ण या स्पर्धेत ६.५ गुणांसह सातव्या स्थानी राहिला. अर्जुन एरिगैसी ५.५ गुणांसह दहाव्या, तर लिऑन ल्यूक मेंडोंका ५ गुणांसह तेराव्या स्थानावर राहिला. या स्पर्धेच्या चॅलेंजर्स गटामध्ये चेक प्रजासत्ताकच्या थाई दाई व्हॅन एन्ग्यूयेनने ९.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. त्यामुळे, पुढील वर्षी त्याला मुख्य फेरीत प्रवेश मिळेल. (Chess)
Gukesh over-presses in an equal endgame and loses a piece! Praggnanandhaa wins the #TataSteelChess Masters! pic.twitter.com/MHkOZ6vnnd
— chess24 (@chess24com) February 2, 2025
हेही वाचा :