भुवनेश्वर : ओडीशामध्ये भयंकर घटना घडली. पंधरा वर्षाची मुलगी मैत्रिणीच्या घरी जात असताना तिचे अपहरण करून तिला पेटवून देण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत तिला एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Girl set on fire)
बायाबर गावात ही भयंकर घटना घडली. मोटारसायलवरून आलेल्या तिघांनी तिचे अपहरण केले आणि तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शनिवारी (१९ जुलै) ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात ही घटना घडल्याचे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलीला गंभीर अवस्थेत एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले. ती ७०% भाजली आहे, परंतु ती बोलू शकते, असे त्यांनी सांगितले. (Girl set on fire)
महिला आणि बालविकास विभागाच्या प्रभारी उपमुख्यमंत्री पार्वती परिदा म्हणाल्या की, मुलीच्या उपचाराचा खर्च सरकार उचलेल. आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
बालंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बयाबर गावात सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा ती मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती. (Girl set on fire)
मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी संबंधित मुलीला अडवले. तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून भार्गवी नदीच्या काठावर नेले. तेथे तिच्या अंगावर ज्वालाग्रही पदार्थ टाकण्यात आला आणि पेटवून दिले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनेचे ठिकाण तिच्या नुआगोपालपूर बुस्ती येथील घरापासून सुमारे १.५ किमी अंतरावर आणि बालंगा पोलीस ठाण्यापासून सुमारे ५-७ किमी अंतरावर आहे. पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली आहेत.