कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते माजी कोल्हापूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर दिवंगत प्रल्हाद चव्हाण यांच्या जयंतीनिमित कोल्हापुरातील ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी महापौर सागर चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण कुटुंबियांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. (Pralhad Chavan)
राजकारणात व समाजकारणामध्ये दिवंगत प्रल्हाद चव्हाण आयुष्यभर एकनिष्ठ म्हणून राहिले. त्यांची फुटबॉलवर निष्ठा होती. स्वतः उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होते. त्यांचे राजकीय सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. त्यांचे फुटबॉल विषयी असणारे योगदान विचारात घेऊन चव्हाण परिवारातर्फे त्यांच्या काळातील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवणाऱ्या जुन्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रल्हाद चव्हाण यांच्यासमवेत खेळलेल्या खेळाडूंनी अनुभव सांगितले. राजपत्रित वर्ग एक पदावर निवड झालेली कोल्हापूरची कन्या सायली भोसले हिचा सत्कार करण्यात आला. (Pralhad Chavan)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक मधुकर रामाने, भुपाल शेटे आनंद माने, संजय मोहिते, रियाज सुभेदार, दुर्वास कदम, संदीप सरनाईक, विक्रम जरग यांच्यासह अनेक माजी नगरसेबक, राजकीय, सामाजिक, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील, तसेच मंडप व्यवसायातील अनेक जण उपस्थित होते. (Pralhad Chavan)
सत्कार झालेल्या खेळाडूंची नावे अशी, बाळासाहेब निश्चिते, संभाजी मांगुरे पाटील, श्रीनिवास गणपत जाधव, शरद माळी, शामराव देवणे, धौडीराम कांबळे, चंद्रकांत जाधव, विश्वास कांबळे, प्रकाश पाटील, चंचल देशपांडे, माणिक मंडलिक, सूर्यकांत उर्फ बाबू पाटील, उमेश चरपले, दत्तात्रय मंडलिक, उदय पोवार, शरद मंडलिक, सर्जेराव साळोखे, रवींद्र मुळीक, गणपतराव साठे, एम टी साळोखे, किशोर साठे, राजू पोवार, अरुण नरके, चंद्रकांत साळोखे. (Pralhad Chavan)