नवी दिल्ली : प्रतिनिधी : जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी वापर केलेल्या पॅलेट गन च्या कारवाईत जखमी झालेल्यांना न्याय द्या या मागणीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी शुक्रवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राहूल गांधी यांनी कॅनॉट प्लेस येथील डीसीपी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट घेऊन पोलिसांची कारवाई विरोधात आणि पॅलेट गनच्या वापर केल्याबद्दल पिडितांची तक्रार नोंदवून घेण्याची मागणी केली. जोपर्यंत तक्रारीची नोंद होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असेही राहूल गांधींनी सांगितले. (Rahul Gandhi stages a sit-in outside the police station)
पॅलेट गनमुळे एका डोळ्याची दृष्टी गेली
१९ वर्षीय साहिल लोहखाब पॅलेट गन मुळे गंभीर जखमी झाला होता. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने राहूल गांधी आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत साहिल आणि त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले आहेत. (Rahul Gandhi stages a sit-in outside the police station)
दिल्ली पोलिसांची एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ
विद्यार्थी आंदोलनात लाठीमाराचा आदेश, पॅलेट गनचा वापर केल्याबद्दल राहूल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात साहिल लोचाव याच्यावर पॅलेट गनने हल्ला करण्यात आला होता. पण हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात नकार दिला. लोचव यांनी १४ ऑगस्ट रोजी वकिलांच्या उपस्थितीत दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती पण तपास अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पोचही दिली. १७ ऑगस्ट रोजी ई मेल आणि फोन कॉलद्वारे पाठपुरावा करण्यात आला पण डीसीपींनी तपास अधिकाऱ्याचे नाव आणि क्रमांकही दिला नाही. हा दखलपात्र गुन्हा असल्याने एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. पण दिल्ली पोलिस तसे करत नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असे राहूल गांधी यांनी सांगितले आहे. (Rahul Gandhi stages a sit-in outside the police station)