त्रिवेंद्रम : जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह झाला. तो विवाहही जुळे असलेल्या धर्मगुरुंनी लावला. धर्मगुरुंनी मदत करणारेही मदतनीसही जुळेच होते. ही घटना घडली जुलै महिन्यात केरळमध्ये. (Marriage of twin brothers to twin sisters)
३० जुलै रोजी केरळमधील चांगनासेरी मेट्रोपॉलिटन चर्चमध्ये एक दुर्मिळ विवाह झाला. वेट्टुपारंबिल कुंजुमन थॉमस आणि त्याची पत्नी जोमोल यांच्या दोन जुळ्या मुलांचा विवाह कुलथूर पठाणथिट्टा येथील कुंबलुलेलिस टोचिमन आणि मेरीकुट्टी यांच्या जुळी मुलींबरोबर झाला. दोन जुळ्या भावांचा विवाह दोन जुळ्या बहिणीबरोबर होत असताना उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. पण हा विवाह सोहळ्याचे विधी करणारे धर्मगुरुही जुळे भाऊच होते. धर्मगुरुंना मदत करणारे मदतनीसही जुळे होते. चर्चमध्ये विवाह वेदीवर सेम टू सेम ची अनभुती आली होती. (Marriage of twin brothers to twin sisters)
विवाह करणाऱ्या दोघीं बहिणींनी जुळ्या भावांबरोबरच विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय पूर्णत्वास आला. पण हा विवाहही जुळ्या धर्मगुरुंनीच लावावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जुळ्या धर्मगुरुंचा शोध सुरू केला. आजबाजुचे चर्च आणि गावांत विचारपूस केली. त्यांना कांजीरपल्ली येथे फादर अँटो पेझुमकुट्टिल आणि फादर अजो पेझुमकुट्टील यांचा शोध लागला. दोघांनीही विवाह विधी करण्याच निर्णय घेतला आणि ते विवाहाच्या वेळी उपस्थित राहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या सोहळ्याला पाला येथील जुळे वेदीसेवक जेरॉन जेम्स, योहान जेम्स सहभागी झाले. पाहुण्यासाठी हा विवाह अभुतपूर्व ठरला.
विवाह झालेले अखिल आणि निखिल हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात. त्यांच्या पत्नी मॅगी आणि मारिया आयटी क्षेत्रात काम करतात. त्यांचे मार्ग पूर्णपुणे भिन्न असले तरी त्यांनी एकत्रित प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. (Marriage of twin brothers to twin sisters)