कोल्हापूर : प्रतिनिधी : कळंबा परिसरातील सेवानिवृत्त पोलीस मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे प्रमुख सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मधुकरराव चौगुले यांच्या संकल्पनेतून व कळंबा मित्र मंडळाच्या सहकार्याने पंचगंगा स्मशानभूमी येथे चार हजार शेणी दान करण्यात आल्या. (An initiative by the Retired Police Friends Circle)
समाजातील गरज ओळखून, आचार-विचारांचे आदर्श मूल्य जपत हा उपक्रम राबविण्यात आला. अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून, समाजाप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली. यावेळी बोलताना मधुकरराव चौगुले यांनी सांगितले की, “समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवणे हीच खरी सेवा असून, कळंबा मित्र मंडळाच्या माध्यमातून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील” या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमीच्या वतीने सर्व सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. (An initiative by the Retired Police Friends Circle)
या उपक्रमात निवृत्त पीएसआय प्रकाश कांबळे, किशोर डोंगरे, दत्तात्रय कौलवकर, बापूसाहेब काटकर, प्रकाश देसाई, सुभाष कुंभार, आर. वाय. पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, पी. टी. सोलापूरे, शाम देसाई तसेच स्वच्छता दूत अमित देशपांडे, कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमी सेवादूत अभिजीत पंडत, रवी कांबळे, संदीप लिगाडे आदी उपस्थित होते. (An initiative by the Retired Police Friends Circle)