कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक पी.जी. मेढे यांचे आज शुक्रवारी कोल्हापुरात निधन झाले. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासह विविध साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. गेले काही दिवस ते आजारी होते.
पी.जी. मेढे यांनी अनेक साखर कारखान्यांमध्ये एमडी म्हणून काम करताना त्यांनी अभ्यासू, होतकरी तरुणांना अधिकारी म्हणून घडवले. ते साखर उद्योगाचे जाणकार होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखर उद्योगाची स्थानिक साखर उद्योगाशी सांगड घालून साखर उद्योगाचा विकास कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शनही करत. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना ते मार्गदर्शन करत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ कारखान्यासह राज्य सरकारला होत असे. त्यांच्या निधनाबद्दल सहकार क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. (Sugar scholar P.G. Medhe passes away)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. राजू शेट्टी यांनी असे म्हटले आहे की, साखर उद्योगातील जाणकार अभ्यासक , छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी मेढे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना. गेली ३० वर्षाहून अधिक काळ साखर कारखानदारीबरोबरचा आमचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये कारखानदार व शेतकरी आंदोलक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम मेढे साहेब करत असत व लवकरात लवकर आंदोलन मिटविण्याचा ते प्रयत्न करत. दरवर्षी त्यांच्यामध्ये व संघटनामध्ये वैचारिक वाद व्हायचां पण त्यांनी कधी व्यक्तीगत कटूता निर्माण केली नाही. (Sugar scholar P.G. Medhe passes away)
साखर उद्योगातील त्यांना चांगला अभ्यास होता. त्यांनी राज्य व केंद्र सरकारला साखर उद्योगात अनेक चांगले धोरण तयार करण्याबाबत उपाययोजना सुचविण्याचे काम त्यांनी केले. केंद्र किंवा राज्य सरकार जेंव्हा साखर उद्योगातील चुकीचे धोरणे राबवित असत तेंव्हा ते ठामपणे आमच्या सोबत राहून त्याबद्दल स्पष्टपणे आपली भुमिका जाहीर करत असत. (Sugar scholar P.G. Medhe passes away)