नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने हटविणे गरजेचे आहे, ज्यामुळे लाल कांद्याचे दर टिकून राहतील आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना… pic.twitter.com/YISUKcW4z5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 19, 2024
Onion Price Hike
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थ बनवण्यात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार राखीव साठ्यातून १,६०० टन कांदा ‘कांदा एक्स्प्रेस’ या विशेष ट्रेनद्वारे पाठवत आहे. ही गाडी महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरून रविवारी (ता.२०) रोजी दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. (Onion Price)
ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी या उपक्रमाची घोषणा केली. कांद्याची वाहतूक करण्यासाठी पहिल्यांदाच रेल्वेचा वापर करण्यात येत आहे. सरकारला आशा आहे, की या पुरवठ्यामुळे ‘दिल्ली-नॅशनल कॅपिटल रिजन’ (एनसीआर) मध्ये किमती स्थिर राहण्यास मदत होईल. तिथे राखीव साठ्यातील कांदा सध्या ३५ रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकला जातो. सध्या अनेक शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ भाव ७५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. लखनऊ, वाराणसी आणि आसाम, नागालँड आणि मणिपूरसह उत्तर-पूर्व राज्यांमध्येही अशीच व्यवस्था केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
नाशिक ते दिल्ली ट्रेनच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी सध्याच्या बाजार भावानुसार कांद्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे खरे यांनी सांगितले. हा निर्णय किफायतशीर आणि कार्यक्षम उपाय आहे. खर्च कमी करण्यासाठी सीलबंद कंटेनर वाहतुकीसाठी सरकार लॉजिस्टिक कंपनी कॉन्कॉर्डशीही चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक ते दिल्ली एक ट्रेन नेण्यासाठी रेल्वेने ७०.२० लाख रुपये खर्च येतो, तर रस्त्याने ८४ लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रति ट्रेन १३.८० लाख रुपयांची बचत होते. कांदा आणि बटाट्याच्या दरात वाढ झाल्याने घरचे अन्न महाग झाले आहे. पाच सप्टेंबरपासून सरकार मोबाईल व्हॅन, ‘नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया’ (एनसीसीएफ) आणि ‘नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ (नाफेड) दुकाने, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, मदर डेअरी यासह विविध माध्यमांद्वारे त्याचा साठा करेल. फळ दुकाने आणि मध्यवर्ती दुकानांमध्ये सवलतीच्या दरात कांदा विकला जात आहे.
आणखी ८६ हजार टन कांदा बाजारात
दिवाळीपूर्वी मोबाईल व्हॅनची संख्या ६०० वरून १,००० केली जाईल. ४.७ लाख टन कांद्याच्या बफर स्टॉकपैकी ९१,९६० टन ‘एनसीसीएफ’ आणि ‘नाफेड’ला वाटप करण्यात आले आहेत. याशिवाय गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मणिपूरसह विविध राज्यांमध्ये ८६ हजार टन माल पाठवण्यात आला आहे. (Onion Price)
हेही वाचा :