कोल्हापूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना, गरीब, शेतकरी, युवक व महिला (GYAN-Garib, Yuva, Annadata, Nari) यांच्या विकासावर भर असणार असल्याचे म्हटले आहे. परंतु करपात्र उत्पन्न मर्यादेत वाढ ही या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्वाची घोषणा आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त केले. (Budget analysis )
बाजारातील क्रयशक्ती वाढविण्यासाठी आयकरपात्र उत्पन्नाची मर्यादा १२ लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे मध्यम वर्ग व उच्च उत्पन्न गट यांना प्रत्यक्ष फायदा होईल तर बाजारात क्रयशक्ती निर्माण झाल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल अशी आशा आहे. . (Budget analysis )
आरोग्यविषयक बाबी आशादायक
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा वाढवण्यात येणार आहेत. ३६ जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केल्याने ती औषधे स्वस्त होण्याची शक्यता आहे. या दोन्ही आरोग्यविषयक बाबी आशादायक आहेत.
किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सात कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. . (Budget analysis )
शिक्षणासंबंधी काही तरतुदी असल्या तरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित केलेल्या सकल उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही यामुळे दुर्लक्षित नियोजनाचा अभाव शिक्षण क्षेत्रासाठी मर्यादा निर्माण करणारा ठरू शकतो.
एसस्सी, एसटी उद्योजकांसाठी महत्त्वाचा निर्णय
अनुसूचित जाती-जमातीच्या MSME महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना आणली जाणार, पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या (First Generation Entrepreneurs) महिलांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात येणार आहे ही गोष्टही स्वागतार्ह असल्याचे प्रा. महाजन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त
स्टार्टअप आणि पर्यटनक्षेत्राला बुस्ट
हमीभाव दिला तरच शेतकरी डाळी, तेलबीयांकडे वळेल
विकसित भारतास पूरक अर्थसंकल्प
शिक्षण, आरोग्यावर चर्चा नाही