जमीर काझी : मुंबई : काहीजण माझ्या नावाची बोंबाबोंब करत होते मात्र आमचे नेते अजित दादा माझ्या पाठीशी ठामपणे राहिले, आणि मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मुंबईत राष्ट्रवादीचा महापौर होईल, किंवा आमच्या मदतीशिवाय महापौर होत नाही, निवडणूक अधिकारी भाजपा- शिवसेना शिंदे गटाला सहाय्य करीत आहेत, त्यांना कोर्टाकडून धडा शिकवला जाईल, असा हल्लाबोल माजी मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. (Nawab Malik launches an attack on the BJP)
साडेतीन वर्षानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली. कोणाला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज असो नसो आमची ताकद मुंबईत किती आहे हे १६ जानेवारीला समजेल असे सांगून मलिक म्हणाले,’ पक्षाच्या माध्यमातून ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून ९५ व्या जागेवरही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण तो किरकोळ कारणावरून रद्द करण्यात आला आहे. तर धारावी आणि रमाबाई आंबेडकरनगर – कामराजनगर येथे पुरस्कृत उमेदवार आहेत. (Nawab Malik launches an attack on the BJP)
माझ्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन समितीने संपूर्ण चर्चा करुन उमेदवार निवडले आहेत. काही लोकं माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते नवाब मलिक असतील तर आम्ही युती करणार नाही. मात्र आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी युतीची गरज नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू ही भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो, असा टोला भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांना लगावला.
नवाब मालिक म्हणाले,’ आमच्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त असून डॉक्टर, वकील, इंजिनिअर, भाजी विक्रेते, सफाई कामगार, आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषिक किंवा या राज्यातील भूमीपूत्र जे मुंबईला कर्मभूमी समजतात त्यांना संधी दिलेली आहे. सर्वधर्मीय लोकांना शिवाय मुस्लिम घटक, ख्रिश्चन, या घटकातील उमेदवारांना संधी दिली आहे. बरेच लोक उत्तर भारतीयांना आपली स्वत:ची मते समजतात. असा भाजपाला टू ला जाऊन ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईत सर्वाधिक उमेदवारी उत्तर भारतीयांना दिली आहे. २००२ पासून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना निवडणूक १४ जांगाच्यावर जाऊ शकत नाही,असा एक आभास निर्माण करण्यात आला. मात्र यावेळी एक वेगळे चित्र मुंबईत राहणार आहे. (Nawab Malik launches an attack on the BJP)
तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जातील… निवडणूक निर्णय अधिकारी भाजपा व शिवसेना शिंदे गटाला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप करून मलिक म्हणाले,’ नियम कायदे बाजूला ठेवून पाहिजे ती उमेदवारी रद्द करायची. जे अपात्र आहेत त्यांची उमेदवारी रात्री साडेदहा वाजता पात्र आहेत असे जाहीर करायचे प्रकार घडले आहेत.आपला आयोगाबद्दल आक्षेप नाही. पण याप्रकरणी कोर्टात गेल्यावर अधिकार्यांच्या नोकर्या जाणार आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे. मुंबईत अशाप्रकारे घडत आहे.आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. आम्ही जे पत्र देणार आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष घावे.’ असेही त्यांनी सांगितले.
.