गॉल : पाहुण्या बांगलादेशने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच डावात यजमान श्रीलंकेस दोन दिवस घाम गाळायला लावला. पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने ९ बाद ४८४ धावा केल्या होत्या. (Bangladesh)
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या दिवशी ३ बाद २९२ धावा केल्या होत्या. कर्णधार नजमुल शांतो आणि मुश्फिकुर रहीम हे दोन्ही शतकवीर खेळपट्टीवर होते. बुधवारी, या दोघांनी बांगलादेशला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर फर्नांडोने शांतोला बाद करून ही जोडी फोडली. शांतोने २७९ चेंडूंमध्ये १५ चौकार व एका षटकारासह १४८ धावा केल्या. त्यानंतर, मुश्फिकुरने लिटन दाससोबत पाचव्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, सुमारे दोन तास पावसाचा व्यत्यय आल्यामुळे दिवसभरात ६१ षटकांचाच खेळ होऊ शकला. (Bangladesh)
दिवसाच्या अखेरच्या सत्रामध्ये फर्नांडोनेच मुश्फिकुरला बाद केले. मुश्फिकुरने ३५० चेंडूंमध्ये ९ चौकारांसह १६३ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकामध्ये लिटन दास बाद झाला. दासचे शतक १० धावांनी हुकले. त्याने १२३ चेंडूंमध्ये ११ चौकार व एका षटकारासह ९० धावा केल्या. या दहा षटकांमध्ये बांदलादेशने ५ विकेट गमावल्या. खेळ थांबला, तेव्हा हसन महमूद आणि नाहीद राणा हे दोघे खेळपट्टीवर होते आणि दोघांनीही अद्याप खाते उघडलेले नाही. श्रीलंकेतर्फे फर्नांडो, मिलन रत्नायके आणि थारिंदू रत्नायके यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (Bangladesh)
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – पहिला डाव १५१ षटकांत ९ बाद ४८४ (नजमुल होसेन शांतो १४८, मुश्फिकूर रहीम १६३, लिटन दास ९०, असिथा फर्नांडो ३-८०, मिलन रत्नायके ३-३८, थारिंदू रत्नायके ३-१९६) विरुद्ध श्रीलंका.
हेही वाचा :
हेडिंग्लेची खेळपट्टी भारताच्या पथ्यावर?
एका ‘टी-२०’त तब्बल तीन सुपर ओव्हर!