MNS
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या मनसेला आता आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे , पालघरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे ते पक्षातच राहणार की, अन्य कुठली पक्षात प्रवेश करणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जाधव यांनी स्वतः ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात ते तिसऱ्या स्थानावर राहिले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे. यानंतर जाधव आगामी राजकीय भूमिका कोणती घेतात, याकडे ठाण्यातील मनसे सैनिकाचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरची जवळीक घातक ठरल्याचे मत पराभूत उमेदवारांनी नोंदवले.
आज राज यांनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीमध्ये ‘ईव्हीएम’संदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज यांच्याकडे केल्या. भाजपबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरली नाही, असे पराभूत उमेदवारांनी राज यांना सांगितले आहे. राज यांनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण ४२ उमेदवार उभे केले होते; मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा दादर-माहीम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर राज यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावले होते. नेमका पराभव कशामुळे झाला याची चाचपणी त्यांनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता. सभांना गर्दी होत होती, मग त्याचे रूपांतर मतांमध्ये का झाले नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील, अशी अपेक्षा मनसेला होती; मात्र १३८ उमेदवार उभे करून एकही उमेदवार निवडून आला नाही. या वेळी बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीला भाजपशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता; मात्र विधानसभेला भाजपशी जवळीक करणे फायद्याचे ठरले नाही, असे पराभूत उमेदवारांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज यांनी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटते, हे जाणून घेतसे. आता राज यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
मुंबई : प्रतिनिधी
उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम हे प्रामुख्याने शरद पवार यांनी केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज म्हणाले, की एका बाईला तीन मुले असतात. पहिल्या मुलाचे लग्न होते. त्या वेळी सासू आणि सुनेचे भांडण होते आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. भांडखोर सून होती, म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचे लग्न होते. दुसरी सून घरी येते. या वेळी दुसऱ्या सुनेचेदेखील सासूसोबत भांडण होते. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगादेखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळते, की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे.
शिवसेनेची सासू बसली आहे ना, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात २०१९ पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव, अशी टीका राज यांनी केली. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, अशी टीका राज यांनी केली आहे.
राज यांनी लालबाग येथे बोलत असताना पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे ते म्हणाले. फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर चालू झाले आहे, या टीकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, ग्रामीण भागातील मुले मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. मुंबई-पुण्यातील मुले विदेशात जायचे बघतात. आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. अनेक विषय आहेत, या गोष्टींची सोडवणूक झाली नसल्याने हे लोक तुमचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून काही गोष्टींची सोय करून ठेवली आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या पद्धतीचे राजकारण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राजकारण चालते, तसे महाराष्ट्राचे होऊ नये. अत्यंत भीषण आणि घाण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. महाराष्ट्रातला एकोपा, आमच्या संतपरंपरा, आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकत्र राहण्याची शिकवण, सर्व विसरून चाललोय आपण. का? यांच्या स्वार्थी राजकारणासाठी, अशी टीका करून ते म्हणाले, की शिवसेना भाजपला मतदान केल्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि ज्यांच्या विरोधात मांडीला मांडी लाऊन बसली, केवळ त्या खुर्चीसाठी. तुम्हाला तुमच्या मताचा अपमान नाही वाटला हा? स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधकांच्या सोबत जाऊन आघाडी करत सत्ता स्थापन केली, असा टोला राज यांनी उद्धव यांना लगावला.
पक्ष मेले, तरी चालतील, महाराष्ट्र जगवा!
शरद पवार यांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले. तुमचे मित्र, तुमचा परिवार महाराष्ट्रात जिथे कुठे असतील, तिथे त्यांना सांगा किमान यातून तरी आता आपण महाराष्ट्र बाहेर काढू. मी माझ्या अनेक सभांमधून सांगितले उद्या मनसे असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस; हे सगळे पक्ष मेले तरी चालतील; पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे राज म्हणाले.
मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी केली.
वरळीतील मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचार सभेत त्यांनी ठाकरे व शरद पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. त्यांचे पुतणे व वरळीतील विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, सर्वजण म्हणतात, मी भूमिका बदलतो. मात्र भूमिका बदलणे म्हणजे काय हे उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यानंतर लक्षात येते. २०१९ ची निवडणूक भाजपा व शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्रित लढवली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह प्रचार सभांमध्ये पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे सांगत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला नाही. मात्र निवडणूक निकालानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याशिवाय सरकार बनत नाही. त्यावेळी त्यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासमवेत गेले. त्यांना जर पदाच्या वाटणीबाबत ठरले होते तर ते आधी का बोलले नाहीत?, शरद पवार यांनी यांचे निम्मे राजकीय आयुष्य भूमिका बदलण्यातच गेले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, असे ते म्हणाले.
आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचे, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराची, अशी गोष्ट कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली, तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले; पण यांनी त्यांच्याच बाजूला दुकान मांडले. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले, अशा शब्दांत उद्धव यांच्यावर हल्ला चढवत ते म्हणाले, की उद्धव यांच्या व्यक्तिगत महत्वकक्षेतून हे झाले. मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे यासाठी भाजपशी सौदा गेला.
मोदी, अमित शाह वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? सुरुवातीला शरद पवार यांच्यांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहील इथे, अशी टीका करून राज म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी गोष्ट केली, ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजूला काढले. काँग्रेससोबत जाऊन बसणे हे कोणालाच पटले नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती; पण मध्ये कोविड आला, असे ते म्हणाले.
मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार नाही, असे आव्हान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले. वरळीतील मनसेचे उमेदवार देशपांडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. ते म्हणाले की, ‘संपूर्ण शहराचा विचका झाला आहे. कोणाचे लक्ष नाही. मागे रझा अकादमीचा मोर्चा निघाला होता. आझाद मैदानावर त्यांनी चॅलेनच्या ओबी व्हॅन फोडून टाकल्या. पोलीस भगिनींवर हात टाकले. त्या मोर्चाच्या विरोधात कोणीही आवाज काढला नाही.
फक्त मनसेने मोर्चा काढला. त्यावेळी एक कमिश्नर होते. ते पोलिसांना सांगत होते ते काहीही करतील पण तुम्ही हात नाही उचलायचा. मग दांडके कशाला दिलेत, गरबा खेळायला ?’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले माहितीये सगळ्यांना. काही विचारधाराच राहिलेली नाही. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरचे बाळासाहेचांच्या नावापुढचे हिंदूहृदयसम्राट हे शब्द काढून टाकले होते. काही होर्डिंगवर तर ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ आले अशी टीका त्यांनी केली.
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विकास म्हणजे केवळ पूल बांधणे नव्हे तर अकलेचाही विकास व्हावा लागतो. राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत असून निवडणुकीनंतर फेकून देतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे. त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा आणि क्रांती घडवा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केले. (Raj Thackeray)
दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच पॉडकॉस्टद्वारे जनतेशी संवाद साधला. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना यावेळी निवडणुकीत मनसेला मतदान करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटांवरही अप्रत्यक्ष टीका केली.
ते म्हणाले ही निवडणूक महत्वाची असून तुम्ही बेसावध राहू नका. तुम्ही बेसावध राहावे, म्हणून राजकीय पक्ष आपापले खेळ करून जातात. त्यामुळे पुढली पाच वर्षे तुम्हाला पश्चातापाशिवाय काही पर्याय राहत नाही. तुम्हाला गृहीत धरले जात आहे. तुमच्या मतांशी प्रतारणा केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना, मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे क्रांती करा, वचपा काढा, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र साकारणाचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Raj Thackeray)
फक्त पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकास हा अकलेने व्हावा लागतो, जगभरातले देश प्रगती पथावर आहेत. तर आपण अजूनही चाचपडत आहोत. याचा राग तुम्हाला येत नाही का? तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देत आहात. मग पश्चातापाची वेळ येणारच, तुम्ही बेसावध राहता. त्यामुळे वेड्यावाकड्या युती, आघाड्या झाल्या. त्यातले काही जण आज बोलतील. एकमेकांची उणीधुणी काढतील. पण त्यात तुम्ही नसाल, असा टोलाही राज यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ()
ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही तुमचे शस्त्र मॅन करता. निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे. त्याचा वापर मतदाना दिवशी करा. आता संधी आली आहे. तुम्ही आतापर्यंत सर्वांना संधी दिली आहे. आता एक संधी आम्हालाही द्या, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
आपण केवळ आपट्याची पाने लुटतोय..
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे सोने गेली अनेक वर्ष लुटले जात आहे. आपण फक्त आपट्याची पाने एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याच्या पानाशिवाय काही राहिलेले नाही. जातीपातीच्या राजकारणात आपण अडकलो आहोत. तुम्ही बेसावध राहाता. त्याचा फटका तुम्हाला पुढची पाच वर्षे बसतो. राजकीय पक्ष आपला खेळ करून जातात. प्रगती झाल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा :
मुंबई : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट निर्णय दिलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुपसोबत मागाठाणे आणि माहीम मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यावरोधात ठाकरे यांना उतरविण्याची व्यूव्हरचना शिंदे यांनी आखली आहे. (Amit Thackeray)
हेही वाचा :