सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने १८ जागा जिंकल्या आहेत. भाजपने १६ तर काँग्रेस पक्षाने ११ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला सहा तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादी अजित पवार गटांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे, रयतक्रांती, जनसुराज्य शक्ती या पक्षांच्या प्रत्येकी एक जागा निवडून आल्याने त्यांनाही महत्व आहे आहे.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची धुरा आमदार जयंत पाटील यांच्याकडे होती. त्यांनी वाळवा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावताना २२ पैकी १४ जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेत ११ पैकी आठ जागा जिंकल्या. तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले. (NCP SP party is the largest party in Sangali ZP)
शिवसेना शिंदे गटाने खानापूर, आटपाडी, वाळवा तालुक्यात यश मिळावले. त्यांनी सहा जागा जिंकल्या. काँग्रेसने पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव तालुक्यात चांगले यश मिळावले. काँग्रेसने ११ जागा जिंकून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. (NCP SP party is the largest party in Sangali ZP)
सांगली जिल्ह्यात सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कुणाची कुणाबरोबर युती होणार यावर अध्यक्षपद ठरणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना, रयतक्रांती, जनसुराज्य एकत्र आले तर महायुतीची सत्ता येऊ शकते. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र आल्यास त्यांना बहुमतासाठी फक्त एकच जागा कमी पडते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची राज्यात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पाठिंबा दिल्यास दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्षाचा झेंडा सांगली जिल्हा परिषदेवर फडकू शकतो. (NCP SP party is the largest party in Sangali ZP)