नवी दिल्ली : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी (८ ऑगस्ट) जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी खोटारडे आणि लबाड आहेत, असा आरोप त्यांनी केला. (Minister Yadav slams Rahul)
बनावट मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाल्याचे ते खोटे सांगत आहेत, सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. एका विशिष्ट पक्षाला फायदा व्हावा म्हणून भारतीय निवडणूक आयोगाला ते धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना यादव म्हणाले की, गांधी यांच्या विधानांमध्ये विश्वासार्हता नाही. ते सतत खोटे बोलत आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राहुल गांधींना यांना त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांबद्दल पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. (Minister Yadav slams Rahul)
राहुल गांधी निवडणूक आयोगाबद्दल खोटे बोलत असल्याने त्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. महाराष्ट्रातील मतदार फेरफार आणि फुगीर मतदार यादींबद्दल गांधी यांनी केलेले दावेही यादव यांनी फेटाळून लावले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मतदारांची संख्या एक कोटीने वाढल्याचे गांधी यांनी म्हटल्याबद्दल यादव यांनी त्यांच्यावर टीका केली. (Minister Yadav slams Rahul)
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीचा हवाला देत, यादव यांनी स्पष्ट केले की प्रत्यक्षात फरक अंदाजे ४० लाख मतदारांचा होता. राहुल गांधी यांनी तो ६० टक्क्यांहून अधिक वाढवला. यावरून असे दिसून येते की त्यांचे संपूर्ण विधान खोट्यावर आधारित आहे, असे यादव म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस धमकावत असल्याचा आरोपही केला.
‘‘आम्ही सत्तेत आलो की, निवडणूक अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. लोकशाहीत विरोधी पक्षाच्या नेत्याच्या तोंडी ही भाषा योग्य आहे का?’’ असा प्रश्नही त्यांनी विचारला.
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी भारतीय सैन्यासह महत्त्वाच्या लोकशाही संस्थांना राहुल गांधी कमकुवत करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री याव यांनी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांकडे लक्ष वेधले जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांमध्ये वाढ दिसून आली. परंतु विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यासारख्या विरोधी पक्षांचे होते. (Minister Yadav slams Rahul) “जर फेरफार झाला असेल तर विरोधी पक्ष कसा जिंकला?” असा सवाल करून काँग्रेस एका कुटुंबाच्या हितासाठी सार्वजनिक विश्वासार्हतेला नख लावत खोट्या कथा रचत असल्याचा आरोपही मंत्री यादव यांनी केला.