मुंबई : प्रतिनिधी : माजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबाबास दानवे यांनी व्टिट केलेल्या नोटांची बंडले, थैल्याच्या व्हिडिओ प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फंत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी शक्य असेल तर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली. (Investigate the cash video through the central investigation agency)
दानवेंनी एक्स पोस्टवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये लाल शर्टममधील एक व्यक्ती नोंटाचे बंडल मोजत होती. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत याचे चित्रण आहे. लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर नोटांची रास लागली असून बॅगामधून नोटांची बंड काढून ठेवत आहेत. या व्हिडिओने हिवाळी अधिवेशनात खळबळ उडाली आहे. आमदार दळवींनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा कला आहे. तर हा व्हिडिओ खासदार सुनील तटकरे यांनी पाठवल्याचा आरोप होत आहे. यावर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमासमोर येत या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (Investigate the cash video through the central investigation agency)
खासदार सुनील तटकरे म्हणाले की, देशभक्त महेंद्र दळवी हे निरागस आहेत. त्यांनी म्हटले आहे की तो व्हिडिओ मॉर्फ आहे. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रीय खलनायकाने हा व्हिडिओ अंबादास दानवे यांना दिल्याचा आरोप केला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की, त्यांनी हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे तथ्य शोधून काढावे. अंबादास दानवे यांना ही माहिती राष्ट्रीय खलनायकाने दिली असाही त्यांचा आरोप आहे. ते निरागस देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेवेळीचा तो व्हिडिओ आहे, तर त्याचीही चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशन काळातच त्याची चौकशी पूर्ण करावी. केंद्रीय तपास यंत्रणांची त्यासाठी मदत घ्यावी लागली तर ती देखील त्यांनी घ्यावी. या प्रकरणाचा तपास करुन यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर ३०२ सारखे गुन्हे लावता आले तर ते देखील यामध्ये लावावे, असं सुनील तटकरे म्हणाले. (Investigate the cash video through the central investigation agency)