कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवाजी पेठ वरुणतीर्थवेश गांधी मैदान येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर. पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. ते जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले होते. (Kolhapur)
बी.आर. पाटील यांनी लोकमान्य, पुढारी, सकाळ, सत्यवादी, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम पाहिले, आकाशवाणी,पीटीआय या वृत्तसंस्थेमध्येही त्यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम पाहिले. १९९२ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये मुडशिंगी मतदारसंघातून ते विजयी झाले होते. १९९२ ते १९९७ या काळात ते जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी २९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. (Kolhapur)
हेही वाचा :