कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणीतील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरू असून वनताराचे सीईओ तातडीने कोल्हापूरात दाखल झाले. शुक्रवार पेठेतील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या जैन मठात त्यांनी कोल्हापूर आणि नांदणी मठाच्या महास्वामीसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वनताराचे सीईओ विवान करानी माधुरी हत्ती परत आणण्यासाठी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली. (‘Vantara’ officials announcement)
महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाबत बुधवारी सकाळी मुंबईत बैठक झाली. या बैठकीतही वनताराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महादेवी हत्तीला नांदणीत परत आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. यावेळी अमित शहांसोबत महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी संबधी चर्चा झाली अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यानंतर वनताराचे अधिकारी कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी नांदणी मठात न जाता कोल्हापूरातील शुक्रवार पेठेत नांदणीच्या महास्वामीशी चर्चा केली. (‘Vantara’ officials announcement)
यावेळी बोलताना सीईओ विवान करानी म्हणाले, राज्यसरकार, नांदणी मठ आणि वनतारा एकत्रितपणे सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. आम्ही महादेवी हत्तीणीची चांगली व्यवस्था करणार आहे. हत्तीणीचे आम्ही पुनर्वसन करणार आहोत. अनंत अंबानी यांनी सांगितले आहे की आम्हाला कधीच कोल्हापूर वासियांना दु:ख द्यायचे नव्हेत. त्यांना माधुरीची काळजी वनातारामध्ये घ्यायची होती. यामध्ये इगो अडवा येत नाही. यामध्ये कोणाच् हार किंवा विजय नाही. यामध्ये हत्तीचा विजयच आहे. कारण हत्तीला वनातारामध्येही चांगले घर मिळत होते. आता मठामध्येही चांगले घर मिळत होते. तुमची महादेवी लवकरच कोल्हापुरात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
बैठकीला आमदार राजेंद्र पाटील, यड्रावकर, राहूल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, निवेदिता माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे महास्वामी, कृष्णराज महाडिक आदी उपस्थित होते.
दरम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व कोल्हापूरकरांचे अभिनंदन! माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. (‘Vantara’ officials announcement)

